पारोळा तालुक्यातील राजवड येथे शिक्षण परिषद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 04:38 PM2019-12-01T16:38:48+5:302019-12-01T16:39:05+5:30

राजवड येथे शेळावे केंद्राची चौथी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली.

Education conference at Rajwad in Parola taluka | पारोळा तालुक्यातील राजवड येथे शिक्षण परिषद उत्साहात

पारोळा तालुक्यातील राजवड येथे शिक्षण परिषद उत्साहात

googlenewsNext

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील राजवड येथे शेळावे केंद्राची चौथी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे अध्यक्षस्थानी होत्या.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून शालेय पोषण आहार अधीक्षिका प्रीती पवार, बहादरपूर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी, शेळावे केंद्राचे प्रमुख जितेंद्र पवार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नागेश परदेशी उपस्थित होते. या मान्यवरांनी परिषदेचे उद्घाटन केले.
यावेळी धाबे शाळेचे गुणवंत पाटील यांना महात्मा जोतीराव फुले गुरूगौरव शिक्षक पुरस्कार व राजवड हायस्कूलच्या बबिता पटेल यांना भारतरत्न मौलाना आझाद गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या व शाळेच्या मुख्याध्यापिका पाकिजा पटेल यांच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कला व कार्यानुुभव विषयाच्या विविध वस्तुंचे प्रदर्शन सर्वांना दाखविण्यात आले. शाळेला डीजीटलसाठी टीव्ही संच दिला म्हणून रावसाहेब दिलीप यशवंत पाटील यांचा सत्कार करण्याता आला. या प्रदर्शनात तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि शाळेने निवडलेल्या आदर्श विद्यार्थी अशा ११ विद्यार्थ्यांना धाबे शाळेचे मुख्याध्यापक राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्यातर्फे विविध शैक्षणिक साहित्य बक्षीस देण्यात आले.
शिक्षकांनी आदर्श परिपाठ सादर केला. वैशाली बोरसे यांनी इयत्ता पहिलीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा ज्ञान रचनावादी आदर्श पाठ घेतला . अध्ययन निष्पत्ती वाचन व चर्चा विषय, अध्ययन स्तर निश्चिती यावर वैशाली सोनवणे यांनी मत मांडले.
विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी स्थलांतरीत विद्यार्थी त्यांचे शिक्षण व शिक्षण हमी कार्ड याबाबत मार्गदर्शन केले. आभार रघुनाथ सरदार यांनी मानले.

Web Title: Education conference at Rajwad in Parola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.