फसवणूक : क्रिप्टोत अठराशे कमावले अन् तब्बल १४ लाख गमावले!

By विजय.सैतवाल | Published: March 10, 2024 08:02 PM2024-03-10T20:02:20+5:302024-03-10T20:02:31+5:30

सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Earned Eighteen Hundred in Crypto and Lost Over 14 lakh! | फसवणूक : क्रिप्टोत अठराशे कमावले अन् तब्बल १४ लाख गमावले!

फसवणूक : क्रिप्टोत अठराशे कमावले अन् तब्बल १४ लाख गमावले!

जळगाव: नामांकित कंपनीचे बिटक्वाॅइन खरेदी करून त्यात अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवून सर्वेश किरण भोसले (रा.यशवंतनगर) यांची १४ लाख १२ हजार ९२६ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार २ मार्च ते ४ मार्चदरम्यान ऑनलाइन पद्धतीने घडला. याप्रकरणी ९ मार्च रोजी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसले यांच्याशी अनोळखीने २ ते ४ मार्चदरम्यान संपर्क साधून टेलिग्राम खात्यावर एक लिंक पाठवली. तिला क्लिक केल्यानंतर क्रिप्टो करन्सीसंबंधित कंपनीचा लोगो, बनावट वेबसाइट नामांकित कंपनीचे असल्याचे भासवण्यात आले. त्यानंतर भोसले यांना बिटक्वाॅइन विकत घेण्यास सांगून सुरुवातीला एक हजार ८०० रुपये नफा दिला.

त्या माध्यमातून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी १४ लाख १२ हजार ९२६ रुपये स्वीकारले. त्यावर नफा व मुद्दलही मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले व भोसले यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.

Web Title: Earned Eighteen Hundred in Crypto and Lost Over 14 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.