गिरणा नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:54 IST2019-05-28T15:53:53+5:302019-05-28T15:54:24+5:30
पुनगाव येथील घटना

गिरणा नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू
पाचोरा : गिरणा नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी ५ वाजेचे सुमारास घडलीे.
केकडीया गणसिंग किराडे (वय २४, रा. पुनगाव ता. पाचोरा) असे या युवकाचे नाव आहे. तो गिरणा नदी पात्रातील डोहात बुडून मरण पावला. पुनगाव येथे मजुरी साठी मध्यप्रदेशातून पावरा समाजाचे कुटुंब ७ ते ८ वर्षांपासून आले आहे. या कुटुंबातील हा युवक आहे. तो कपडे धुण्यासाठी नदीपात्रात गेला असता नदीतील डोहात पाय घसरून तो पडला. पोहता येत नसल्याने केकडीया पाण्यात बुडुन मरण पावला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.