द्वारकाई व्याख्यानमाला यंदा २५ पासून ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:31+5:302021-07-21T04:13:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : शहरातील जय गणेश फाऊंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय ऑनलाईन द्वारकाई ...

Dwarkai Lecture Series online from 25th this year | द्वारकाई व्याख्यानमाला यंदा २५ पासून ऑनलाईन

द्वारकाई व्याख्यानमाला यंदा २५ पासून ऑनलाईन

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : शहरातील जय गणेश फाऊंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय ऑनलाईन द्वारकाई व्याख्यानमालेचे आयाेजन केले आहे. या सांस्कृतिक, वैचारिक उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष आहे.

पुण्याचे कवी देवा झिंजाड हे २५ जुलै राेजी सकाळी १०.३० वाजता ‘कविता आई-बापाच्या’ या विषयावर प्रथम पुष्प, तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे कवी नितीन चंदनशिवे हे २७ जुलै राेजी सकाळी १०.३० वाजता ‘वेदनेचा तळ शाेधणारी कविता’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफतील.

यवतमाळ जिल्ह्यातील सवना येथील गझलकार आबिद मन्सूर शेख हे २९ जुलै राेजी ‘अशी बहरली माझी गझल’ या विषयावर तृतीय पुष्प गुंफतील.

काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर यंदाही मर्यादा आहेत. ही बाब लक्षात घेऊन ही व्याख्यानमाला झूम मिटिंगद्वारे घेण्यात येत आहे.

मनाेरंजन वाहिन्यांच्या मायाजालात अडकलेल्या नव्या पिढीला वाचन, श्रवणाची गाेडी लागावी म्हणून फाऊंडेशनने हा सांस्कृतिक वैचारिक उपक्रम सुरू केला आहे. यंदा सातवे वर्ष आहे. माय, माती, माणूस ही या व्याख्यानमालेची मध्यवर्ती संकल्पना असते, असे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, माजी नगरसेविका सुषमा नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Dwarkai Lecture Series online from 25th this year