कोविड केंद्रातील शिक्षकांची ड्युटी रद्द करावी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:16 IST2021-05-09T04:16:23+5:302021-05-09T04:16:23+5:30
जळगाव : जिल्ह्यातील काही शिक्षकांच्या नियुक्त्या कोविड केंद्रात केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी वेळ देता येत नाही. ...

कोविड केंद्रातील शिक्षकांची ड्युटी रद्द करावी...
जळगाव : जिल्ह्यातील काही शिक्षकांच्या नियुक्त्या कोविड केंद्रात केल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी वेळ देता येत नाही. त्यामुळे अशा शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय व गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथे शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अजूनही शिक्षकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही तसेच शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणे व त्यांचा अभ्यास घेणे सुरु आहे. तसेच शिक्षकांना आरोग्य खात्याच्या कामाचा कोणताही अनुभव नाही. हे काम दिल्यामुळे शिक्षक प्रचंड तणावात आहेत. यामुळे त्यांचे विद्यार्थ्यांना शिकवण्याचे मूळ काम होत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करावा तसेच त्यांचे अध्यापनाचे मूळ काम सोडून त्यांना ज्या कामाचा कोणताही अनुभव नाही ते काम त्यांना देण्यात येऊ नये. कोविड केंद्रातील शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.