भर उन्हाळ्यात तापी नदी दुथडी भरून वाहू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 09:43 PM2021-04-12T21:43:15+5:302021-04-12T21:44:44+5:30

तापी नदीला आवर्तन सोडल्याने भर उन्हाळ्यात तापी मुंगसे परिसरात दुथडी भरुन वाहू लागली आहे. 

During the summer, the Tapi River began to overflow | भर उन्हाळ्यात तापी नदी दुथडी भरून वाहू लागली

भर उन्हाळ्यात तापी नदी दुथडी भरून वाहू लागली

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या दोन महिन्यापासून तापी नदी पात्र कोरडे ठाक.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंगसे, ता. अमळनेर : तापी नदीला आवर्तन सोडल्याने भर उन्हाळ्यात सुर्य कन्या तापीमाई मुंगसे परिसरात दुथडी भरुन वाहू लागली आहे. 

गेल्या दोन महिन्यापासून तापी नदी पात्र हे कोरडे ठाक पडले होते. तापी नदीतून अमळनेर,चोपडा, धरणगाव, न. पा. यांच्या पाणी योजना पुरवठा केला जातो. आवर्तन सोडल्यामुळे गेले दोन दिवसापासून तापी नदी मुंगसे परिसरात दोन्ही काठ भरून, मुंगसे- तांदुळवाडी, सावखेडा- निमगव्हाण. धावडे - खाचणे. नांदेड- कुरवेल. रूंधाटी- दोंदवाडे. मठगव्हाण- घाडवेलपर्यंत वाहु लागली आहे. या दोन्ही काठच्या गावातील पशुधनाच्या  व गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती.

पुढील दोन महिने तरी पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.  तापी नदी पात्रात पाणीच पाणी पाहुन आनंद व्यक्त केला जात आहे.

Web Title: During the summer, the Tapi River began to overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.