अमळनेरात लॉकडाऊन काळात सात मोटारसायकली जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 14:28 IST2020-04-07T14:25:56+5:302020-04-07T14:28:20+5:30
लॉकडाऊन असतानाही विनाकारण फिरणाऱ्या सात जणांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

अमळनेरात लॉकडाऊन काळात सात मोटारसायकली जप्त
अमळनेर, जि.जळगाव : लॉकडाऊन असतानाही शहरात विनाकारण फिरणाऱ्या सात जणांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. दंड वसूल करण्यात आल्यानंतर त्या संबंधितांना परत करण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, वाहतूक पोलीस संजय पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह पथकाने दिनेश पाटील, विकास पाटील , सागर संदानशिव, कमलेश बाविस्कर, साजिद खाटीक, ईश्वर पाटील, किशोर देवरे हे कारण नसताना गावात मोटारसायकलवर फिरताना आढळले. म्हणून त्यांच्याविरुद्ध शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या मोटारसायकली जप्त केल्या होत्या. दंड वसूल करण्यात आल्यानंतर त्या सोडण्यात आल्या