बोदवड- मलकापूर दरम्यान ट्रॅक मशीन रेल्वे रुळावरुन घसरली

By Admin | Updated: May 5, 2017 12:03 IST2017-05-05T12:03:57+5:302017-05-05T12:03:57+5:30

वाहतूक विस्कळीत : बोदवड-मलकापूर दरम्यान पहाटेची घटना

During the Bodwad-Malkapur track, the train machine collapsed on the railway track | बोदवड- मलकापूर दरम्यान ट्रॅक मशीन रेल्वे रुळावरुन घसरली

बोदवड- मलकापूर दरम्यान ट्रॅक मशीन रेल्वे रुळावरुन घसरली

 भुसावळ, दि.5- रेल्वे रुळावर गिट्टी टाकणारी ट्रॅक मशीन रुळावरुन घसरल्याने नागपूर-मुंबई दरम्यानची प्रवासी व मालवाहतूक वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे विभागातील बोदवड-खामखेडा रेल्वे स्थानकादरम्यान घडली.

ट्रॅक मशीन रुळावरुन घसरल्याचे समजताच येथून तातडीने अॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन रवाना झाली या शिवाय सर्व सबंधित अधिकारी तातडीने डीआरएम कार्यालयातील नियंत्रण कक्षात हजर झाले. 
याबाबत भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक  सुनील मिश्रा यांनी सांगितले की, पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बोदवड-मलकापूर दरम्यान ट्रॅकमशीन रुळावरुन घसरली. तातडीने अॅक्सीडेंट रिलिफ ट्रेन तज्ज्ञ कर्मचारी वर्ग घटनास्थळी हजर झाला. पहाटे सहा वाजता मशीन रुळावरुन बाजुला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. 12111  मुंबई-अमरावती एक्स्प्रेस, 12809 हावडा मेल, 18029 शालीमार एक्स्प्रेस या गाडय़ांना विलंब झाला.

Web Title: During the Bodwad-Malkapur track, the train machine collapsed on the railway track