जनतेच्या ‘संतापाच्या आगीत’ बळी घेणारे डंपर खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:11 PM2020-02-04T16:11:48+5:302020-02-04T16:11:53+5:30

हिंगोण्या जवळील अपघाताचे पडसाद : १२ जणांच्या मृत्यूमुळे लोकभावना भडकल्या

Dumper khak, a victim of the people's 'anger of fire' | जनतेच्या ‘संतापाच्या आगीत’ बळी घेणारे डंपर खाक

जनतेच्या ‘संतापाच्या आगीत’ बळी घेणारे डंपर खाक

Next


हिंगोणे, ता. यावल : रविवारी रात्री डंपरने जीपला धडक मारली आणि बारा जणांचे नाहक बळी गेले. ते अनेकांचे बळी घेणारे डंपर मंगळवारी सकाळी जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसले आहे. हे डंपर जाळले की जळाले याबाबत मात्र साशंकता असली तरी या अपघातामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून या संतापातच हे डंपर रात्रीतून काहींनी जाळले असावे, अशी चर्चा आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास बºहाणपूर अंकलेश्वर या मार्गावर फैजपुर यावल दरम्यान हिंगोणा गावा जवळ झालेल्या अपघातील डंपर हे रस्त्याच्या बाजुुला कलंडलेले होते. मंगळवारी सकाळी ते जळालेल्या अवस्थेत नागरिकांना दिसून आले. डंपर जाळले की जळाले याबाबत मात्र साशंकता आहे.
सदरची भिषण दुर्घटना ही डंपर चालकाच्या बाजुचे पुढील टायर फुटल्याचा कांगवा पोलीसांच्या प्राथमिक चौकशीत करण्यात येत असतांनाच सदरचे डंपर कुणी पेटविले की पेटले ? हा विषय संपुर्ण तालुक्यात चर्चेचा बनला आहे .
रविवारी रात्री झालेल्या अपघाताने परिसरातील नागरीकांना सुन्न करून टाकले असुन , भविष्यात अशा प्रकारे चे अपघात होवु नये याची काळजी घेणे सर्वांसाठी अत्यंत गरजे असल्याची प्रतिक्रीया नागरीक व्यक्त करीत आहे .
हिंगोणा येथे घटनास्थळी पाहणी पोलीस अधिक्षक (ठाणे) डॉ डिंगबर प्रधान, डीवायएसपी नजीर शेख (नाशिक), पोलीस निरीक्षक बच्छाव (धुळे ), सहायक पोलीस निरीक्षक सुनिल मेढे, अफजल तडवी, गिरीष शिंदे, दत्तात्र ये गाळवे यांनी पाहणी केली.

Web Title: Dumper khak, a victim of the people's 'anger of fire'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.