डमी ग्राहक पाठवून दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:32 PM2019-04-20T12:32:18+5:302019-04-20T12:32:45+5:30

चोरलेल्या दुचाकीचे काढून दिले पार्ट-पार्ट

Dummy customers send bribe of bike robbery | डमी ग्राहक पाठवून दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश

डमी ग्राहक पाठवून दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश

Next

जळगाव : स्पोर्टस् व महागड्या दुचाकी हौशेखातर चोरणाऱ्या तरूणांच्या टोळीचा गुरूवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून पर्दाफाश केला़ या टोळीतील किसन यादव व शुभम यादव (रा़ रामेश्वर कॉलनी) या दोन्ही भावांसह एका अल्पवयीन युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ या तिघांनी दोन महिन्यांपूर्वी चोरलेल्या दुचाकीचे पार्ट-पार्ट पोलिसांना काढून दिले आहेत.
सराफ बाजार परिसरातील रहिवासी विशाल अशोक जगदाळे हे कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत़ ९ फेब्रुवारीला घराजवळ बोहरा गल्लीत त्यांनी त्यांची महागडी दुचाकी उभी केली होती़ मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तोंडाला रूमाल बांधलेल्या तीन तरूणांनी ही दुचाकी चोरून नेली होती़ याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
तसेच टोळीतील चौथ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत़ दरम्यान, दोन दुचाकींची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचे समजते़ या दोघांना २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ सरकारतर्फे अ‍ॅड़ सुप्रिया क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले़
भीतीपोटी दुचाकीचे पार्ट-पार्ट काढले
चौकशीअंती या तरूणांनी सराफ बाजार परिसरातून महागडी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली़ ही दुचाकी काढून सुध्दा दिली मात्र, त्याचे पार्ट-पार्ट या तरूणांनी केले होते़ काही दिवस शुभम व किसन याने ही दुचाकी शहरात फिरविली, दुचाकी फिरविल्यास आपण पकडले जाऊ ही भीती होती़ त्यामुळे त्यांनी अक्षरश: दुचाकीचे पार्ट-पार्ट काढून ते विक्रीला काढले होते, असे त्यांनी पोलिसांना चौकशीत सांगितले़ दरम्यान, यांच्याती चौथा संशयित हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत़
चोरट्यांची मिळाली माहिती़़़
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुध्दा काही दिवसांपूर्वी काही दुचाकी चोरीला गेल्या होत्या़ त्यामुळे एमआयडीसी पोलीस देखील चोरट्यांच्या शोधात होते़ अखेर या पोलीस ठाण्यातील डी़बी़ कर्मचारी विजय पाटील, मनोज सुरवाडे यांना गुरूवारी रात्री काही तरूण दुचाकीचे पार्ट विक्री करीत असल्याची माहिती मिळाली़ त्यांनी लागलीच एक डमी ग्राहक तयार करून त्या तरूणांकडे पार्टस् खरेदी करण्यासाठी पाठविला़ त्यावेळी ते तरूण दुचाकी चोरच असल्याचे समोर आल्यानंतर पाटील व सुरवाडे यांच्यासह सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील यांनी रात्रीच एमआयडीसी हद्दीतून त्या तरूणांना सापळा रचून अटक केली़ कसून चौकशी केल्यानंतर किसन यादव व शुभम यादव असे नाव सांगितले तर त्यांचा साथीदार अल्पवयीन युवकासही ताब्यात घेतले़

Web Title: Dummy customers send bribe of bike robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव