शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

ट्रकच्या विचित्र अपघातामुळे महामार्ग सहा तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:23 IST

 मध्यरात्री अपघात : ओव्हरटेक करताना २ ट्रक धडकल्या

ठळक मुद्देचालकाचे ३२ हजार लांबविले

जळगाव : ओव्हरटेक करताना दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने राष्टÑीय महामार्ग सहा तास ठप्प झाला तर या अपघातात ट्रक चालक राजू चॉँद शेख (३५, रा.पिंपळगाव बसवंत, जि. नाशिक) हा चालक जखमी झाला. बांभोरी गिरणा नदी पुलाजवळ रविवारी मध्यरात्री एक वाजता हा अपघात झाला. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, राजू चॉँद शेख हा चालक नशिराबाद येथील कारखान्यातून ट्रकमध्ये (क्र.एम.एच.१५ ई. जी. ५२५६) सिमेंट भरुन शनिवारी रात्री साडे बारा वाजता निघाला. एक वाजता बांभोरी पुल ओलांडतांना एका ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन येणाऱ्या एका ट्रकला वाचविल्यानंतर दुसऱ्या ट्रकवर राजू याचा ट्रक धडकला. त्यामुळे दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाले. अपघातात सिमेंटच्या ट्रकच्या कॅबीनचा चुराडा झाला, त्यामुळे चालक राजू याचा एक पाय व एक हात फ्रॅक्चर झाला. याचवेळी दुसरा ट्रकही या ट्रकवर धडकला.यात दोन ट्रकचे नुकसान झाले. दरम्यान, सिमेंटचा ट्रक डी.के.सोमाणी यांच्या मालकीचा असून निफाड येथे सिमेंट घेऊन जात होता.अन्य दोन ट्रकचेही नुकसानसुरतकडून कोलकाता येथे जात असलेला ट्रक (क्र.डब्ल्यू.बी. २३. डी.१८६२), पाळधीकडून जळगावकडे जात असलेला ट्रक (क्र.एम.एच. १९. झेड.३३५९) आणि सिमेंटने भरलेला ट्रक (क्र.एमएच.१५. इ.जी.५२५६) या एकमेकांवर धडकल्या. मध्यरात्री ट्रक हटविणे जिकरीचे असल्याने पहाटेच्या सुमारास तीन क्रेन मागवून ट्रक रस्त्याच्याकडेला घेण्यात आले. त्यानंतर कुठे वाहतूक सुरळीत झाली.वाहतूक म्हसावदमार्गे वळविलीबांभोरीजवळ अपघात झाल्याने दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. वाहतूक लवकर सुरळीत होण्याचे चिन्हे दिसत नसल्याने पोलिसांनी एरंडोलकडून जाणारे काही वाहने म्हसावद, वावडदा, नेरीमार्गे तर जळगावकडून शिरसोली, वावडदा व म्हसावदमार्गे वाहतूक वळविली होती. सकाळी सात वाजेनंतर वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, या अपघातामुळे नोकरदार व कंपनीत जाणाºया कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जळगावात परिक्षेला येणाºया विद्यार्थ्यांचेही हाल झाले.दरम्यान, सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे, दत्तू खैरनार, युसूफ शेख, घनशाम पाटील, हेमंत महाडीक, आसिफ काझी, पवन तडवी, हिरालाल ऊमळकर, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त वाहनांचे चाकेच निखळल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी शथीर्चे प्रयत्न केले.चालकाचे ३२ हजार लांबविलेया अपघातानंतर राजू शेख याच्या खिशातील ३२ हजार ५०० रुपये लांबविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. राजू हा बाळापूर, जि.अकोला येथे रासायनिक खते घेऊन गेला होता. त्याचे भाडे मिळाले होते. त्यानंतर परत येताना नशिराबाद येथून सिमेंट आणण्याचे काम मिळाले होते. या अपघातानंतर चालकाने ट्रान्सपोर्टच्या एका सहकाºयाला खिशातून पैसे काढायला सांगितले असता त्यात ४ हजार ६०० रुपये होते.असा झाला अपघातराजू हा बांभोरी पुलानजीक पुढे चालणाºया वाहनाला ओव्हरटेक करीत होता. दोन वेळा त्याने ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न केला. एका वेळेला ओव्हरटेक करुन पुढे जात असतानाच बांभोरी गावाजवळ समोरुन भरधाव वेगाने ट्रक आला. हा ट्रक थांबणार नाही, अंगावर येऊ शकतो याचा अंदाज आल्याने राजू याने जागेवरच ब्रेक दाबून ट्रक थांबविला, त्यामुळे समोरुन येणारा ट्रक साईडने निघून गेला. हा ट्रक गेल्यानंतर राजू याने त्याचा ट्रक पुढे नेला आणि लगेच काही कळण्याच्या आतच समोरच्या ट्रकच्या मागील बाजूस ट्रकची धडक बसली. त्यामुळे दोन्ही ट्रक रस्त्यावर आल्या. याचवेळी राजू याचा ट्रक आणखी एका ट्रकवर आदळला.पोलिसांची रात्रभर कसरतया अपघातामुळे पाळधी, महामार्ग व तालुका पोलिसांची रात्रभर कसरत सुरु होती. गिरणा पुलाजवळच अपघात झाल्याने इतरत्र वाहने नेणे शक्य नव्हते. त्यामुळे लहान वाहनांना वाट मोकळी करुन देणे व अवजड वाहनांचा मार्ग बदल करण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागली.

टॅग्स :Accidentअपघात