शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

जळगावातील कन्नड घाटातील रस्ता पावसामुळे खचला, वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 2:03 PM

मुसळधार पावसामुळे जळगाव शहरातील कन्नड घाटातील रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्यान वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

जळगाव, दि. 21 -  पावसामुळे शहरातील कन्नड घाटातील रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्यान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. चाळीसगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणा-या औट्रम (कन्नड) घाटात रविवारी (21 ऑगस्ट) झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हसोबा मंदिराच्या अलिकडे रस्ता खचला आहे. यामुळे घाटातील वाहतूक रविवारी राञी 8 वाजल्यापासून वाहतुकीसाठी थांबवण्यात आला आहे.  

रविवारी चाळीसगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. एकाच दिवशी ५८ मिमि पाऊस झाला.  दुपारीदेखील पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसानं हा रस्ता खचल्याचे लक्षात आल्यानंतर चाळीसगाव वाहतूक  शाखेने पाहणी करुन वाहतूक वेळीच थांबवली, अशी माहिती शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाठ यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याचा भाग खचला तेथे खाली खोल दरी आहे.नागद व नांदगावमार्गे वाहतूक वळविलीदरम्यान कन्नड घाटातील वाहतूक आता नागदमार्गे म्हैसमाळ घाटातून वाहने औरंगाबादकडे जात आहेत. औरंगाबादकडून येणारी वाहने ही  नांदगाव व नागद मार्गाने चाळीसगाव शहराकडे वळवण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेचा अहवाल 'हाय वे अथॉरिटी' ला देण्यात आला असून पुढील कारवाई लवकरच होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रविवारी संध्याकाळी चाळीसगाव-कन्नड असा प्रवास करताना दरड कोसळल्याची व रस्ता खचल्याची माहिती कन्नड येथील शिक्षक राजेंद्र सोनार यांनी घाटातील पोलिसांनी दिली होती. म्हसोबा मंदिरापासून चाळीसगावकडे जाताना १०० ते १५० मीटर अंतरावर २५ फुट रुंद व ४० फुट लांब रस्ता खचल्याने रहदारीस धोका निर्माण झाला आहे. यामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

पोलिसांनी खबरदारी घेत हा रस्ता रविवार रात्री 8 वाजल्यापासूनच वाहतुकीस बंद केला आहे. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून गवताळा-नागद- चाळीसगाव अशी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु; हा मार्ग केवळ छोट्या वाहनांसाठी असल्याने दोन्ही बाजूने मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.