पावसामुळे घराची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:28 IST2018-07-13T00:28:03+5:302018-07-13T00:28:31+5:30
आडगावात सुदैवाने हानी टळली

पावसामुळे घराची भिंत कोसळली
धानोरा, ता.चोपडा : चोपडा तालुक्यातील आडगाव येथील रवींद्र दामू सोये यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून घरातील संसारोपयोगी साहित्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनेची माहिती अशी की, सध्या परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने आडगाव येथील रहिवासी रवींद्र सोये यांच्या घराची विटा मातीत बांधलेली भिंत पावसाच्या पाण्यात भिजून कोसळली. त्यात कोणासही इजा झाली नाही. परंतु घरातील संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. त्यात गॅसहंडी, शेगडी, लोखंडी रॅक, कपाट, धान्य आदी वस्तूंचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले.
भरपाईची मागणी
सोये यांना तत्काळ शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
चोपडा वार्ताहराने कळविल्यानुसार, आडगाव येथे पावसात घराची भिंत कोसळल्यानंतर पंचनामा करण्यासाठी कोणी पुढे येईना, अशी व्यथा नुकसानग्रस्त रवींद्र सोये यांनी व्यक्त केली आहे. तहसील कार्यालयात कोणी दखल घेत नसल्याची त्यांची व्यथा आहे.