पोलीस कारवाईच्या भीतीने जळगावात जुगा-याने घेतली इमारतीवरुन उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:33 IST2018-02-14T22:32:05+5:302018-02-14T22:33:38+5:30
जुन्या बसस्थानक परिसरातील जुगार अड्डयावर बुधवारी दुपारी शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईपासून बचावा व्हावा म्हणून दोघांनी थेट इमारतीहून उडी घेतली. त्यात सुनील पवार नावाचा जुगारी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.

पोलीस कारवाईच्या भीतीने जळगावात जुगा-याने घेतली इमारतीवरुन उडी
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि १४, : जुन्या बसस्थानक परिसरातील जुगार अड्डयावर बुधवारी दुपारी शहर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला.या कारवाईपासून बचावा व्हावा म्हणून दोघांनी थेट इमारतीहून उडी घेतली. त्यात सुनील पवार नावाचा जुगारी जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे.
शहर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, दुष्यंत खैरनार,अक्रम शेख, मोहसीन बिराजदार व रतन गिते यांचे पथक बुधवारी दुपारी जुन्या बसस्थानक परिसरातील इमारतीत वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या जुगार अड्यावर धडकले. जुगाºयांमधील एका जणाने पोलिसांना ओळखले. त्याने ही माहिती जुगार खेळणा-यांना दिली. पकडले जाण्याच्या भीतीने दोन जणांनी इमारतीवरुन उडी घेतली तर सहा जण पोलिसांच्या हाती लागले. या दोघांपैकी एक जण जखमी झाला असून त्याला भास्कर मार्केट परिसरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
सहा जणांना अटक
जुगार खेळणा-या गणेश एकनाथ आकुल (रा.शिवाजी नगर,जळगाव), रफिक गुल मोहम्मद, शरीफ गुल मोहम्मद (रा.गेंदालाल मील, जळगाव)अनिल प्रताप नेतले (रा.कंजरवाडा,जळगाव), सचिन जयराम सपकाळे (रा.शनिपेठ,जळगाव) व सुर्यकांत वसंत शिंपी (रा.जैनाबाद, जळगाव) यांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ११ हजार ४०० रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.