थकबाकीमुळे अजिंठा व्हिजिटर सेंटरचा वीज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 18:40 IST2017-11-12T18:25:52+5:302017-11-12T18:40:39+5:30
३५ लाख ३५ हजार रुपये बिल थकीत असल्याने वीज वितरण कंपनीने केली कारवाई

थकबाकीमुळे अजिंठा व्हिजिटर सेंटरचा वीज पुरवठा खंडीत
आॅनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर, दि.१२ : जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने बांधलेले अजिंठा व्हिजीटर सेंटर कंत्राट दाराचे बिल थकल्यामुळे गेल्या आठ दिवसा पासून बंद करण्यात आले आहे. त्यातच महावितरण कंपनीचे ३५ लाख ३५ हजार ६३० रुपये वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने विज पुरवठा खंडित केला आहे. यामुळे देशी विदेशी पर्यटकांमध्ये नाराजी पसरली आहे .
अजिंठा विकास योजने अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने टी पॉईन्ट येथे अजिंठा लेणी ची अजिंठा व्हिजीटर सेंटर (अजिंठा लेणी ची प्रतीकृती)बांधली आहे. २०१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते याचे उद्घाटन करुन पर्यटकांना पाहन्यासाठी ते खुले केले होते. नांदेड येथील सुमाशंकर मल्टिसर्व्हीसेस या खाजगी कंपनीला देखभाल व साफसफाईचे काम दिले आहे. महामंडळाने या कंपनीने चे बिल गेल्या सहा महिन्यांपासुन दिलेच नाही. त्यामुळे ठेकेदाराने आठदिवसा पासून व्हिजीटर सेंटर पर्यटकांना पाहण्यासाठी बंद केले आहे. तसेच साफसफाई कामगारांना कामावरून बंद केले आहे.
महावितरण कंपनीचे ३५ लाख ३५ हजार ६३० रुपये वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने व्हिजीटर सेंटर चा विज पुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे पर्यटकांना लेणी बाहेर च मिळणारी लेणी ची माहिती आता मिळत नाही.
व्हिजीटर सेंटर हे अभियांत्रिकी विभाग मुंबईच्या अंतर्गत येत असल्याने याविषयी माहिती नाही. वीज बिलसाठी अनुदान हे वरिष्ठ कार्यालयाकडून येते. ते न आल्याने वीज बिल भरता आले नाही.
- अण्णासाहेब शिंदे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
सहा महिन्यांपासून कंपनी स्वत: कामगारांचे पगार करत आहे. तसेच देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील करीत आहे. पर्यटन विकास महामंडळ जोपर्यंत आमचे बिल काढत नाही, तो पर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही.
- सुशीलकुमार जाधव ,संचालक, सुमाशंकर मल्टिसर्विसेस नांदेड.