शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

उधारी फेडण्यासाठी विकावे लागले ठिबक

By ram.jadhav | Updated: December 21, 2017 00:54 IST

कापूस उत्पादक शेतकºयाची व्यथा : गुलाबी बोंड अळीने काढले दिवाळे

ठळक मुद्दे बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील तुळशीराम गायकवाड या शेतकºयाची बिकट अवस्थाज्वारीलाही लागली मर, उत्पन्न आले शुन्यआधुनिक तंत्रज्ञानापासून शेतकरी पुन्हा एक पाऊल मागे

आॅनलाईन लोकमतराम जाधव।जळगाव दि़ २० - उत्पन्न वाढण्याच्या अपेक्षेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्यासाठी घेतलेल्या ठिबक सिंचनाचा संचच बोंडअळीमुळे अपेक्षित उत्पन्नाअभावी उधारीचे पैसे फेडण्यासाठी एका कापूस उत्पादक शेतकºयाला विकावा लागला आहे़ गुलाबी बोंडअळीने झालेल्या या अतोनात नुकसानीमुळे अशी परिस्थिती राज्यातील अनेक शेतकºयांची झालेली आहे़ बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील तुळशीराम गायकवाड या शेतकºयावर ही परिस्थिती ओढवली़तुळशीराम यांच्याकडे एकूण ९ एकर जमीन आहे़ पैकी वेगवेगळ्या वाणांच्या कपाशीची लागवड गायकवाड यांनी केली होती़ पाणी कमी म्हणून त्यांनी ४ वर्षांपूर्वी ५ एकर क्षेत्रासाठी नामांकित कंपनीचे ठिबक केले होते़ अजून उर्वरित २ एकर क्षेत्रावरील कपाशीलाही पाणी देता यावे, म्हणून त्यांनी यावर्षी उधारीवर आणखी दुय्यम दर्जाचे ठिबक घेतले़ त्यातून जेमतेम कपाशीचे पीक बहरलेही, मात्र आलेल्या कैºयांवर गुलाबी बोंडअळीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले़गायकवाड यांना ७ एकर क्षेत्रामध्ये केवळ २२ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळाले़ म्हणजेच एकरी ३ क्विंटल १४ किलो इतके, यासाठी त्यांना एकरी किमान १० ते १२ हजार रुपये इतका खर्च आला आहे़ हा कापूस त्यांनी सरासरी ४ हजार रुपये प्रती क्विंटलप्रमाणे विकला़ त्यातून त्यांना १२,५६० रुपये एकरी उत्पन्न मिळाले आहे़त्यामुळे आता त्यांना संपूर्ण वर्ष कसे काढायचे याची चिंता आहे़ त्यातच उधारीवर घेतलेल्या ठिबकचे पैसे देणे आवश्यक असल्यामुळे ते फेडण्यासाठी नगदी घेतलेले ५ एकरचे ठिबकही विकावे लागले़ अन्यथा हेच ठिबक त्यांना अजून किमान ५ ते १० वर्ष टिकले असते़ मात्र उधारी फेडण्यासाठी तुळशीराम यांना ठिबक विकावे लागल्याने त्यांचे उत्पादन अजूनच घटणार आहे़तरीही तुळशीराम यांना आत्मविश्वास४निसर्गाची साथ नाही, सरकारची मदत नाही, तरीही तुळशीराम म्हणतात, मदत नको, कर्जमाफीही नको, फक्त माझ्या शेतात माल होऊ द्या व त्याला भाव मिळू द्या, मग गरज नाही शेतकºयाला कशाचीच़४अशी प्रामाणिक भूमिका त्यांनी पोटतिडकीने मांडली़तुळशीराम यांच्या घरात पत्नी दोन मुले व आई असा परिवार आहे़४संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर असलेल्या तुळशीरामाला ताठ मानेने जगणे मात्र महत्त्वाचे वाटते, त्यामुळे ठिबक विकून का होईना, मात्र उधारीचे पैसे त्यांनी देण्याचा निर्णय घेतला़गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान कमीच की काय म्हणून, तुळशीराम गायकवाड यांनी एकरभर लावलेल्या ज्वारीला मर लागली, जी काय वाढली तिलाही कणीसचं लागले नाही़ ती अजूनही शेतातच पडून आहे़ त्यामुळे गायकवाड यांचे संपूर्ण गणित बिघडले आहे़‘आम्हाले कर्जमाफी नको अन् कोणतीही सरकारच्या मदतची भिक नको’ फक्त आमच्या शेतात माल पिकला पाहिजे अन् तेले हिशेबात भाव भेट्याले पाहिजे’़ उधारी देणं बाकी हे़-तुळशीराम गायकवाड, भानखेडा, ता़ बोदवड़http://www.lokmat.com/yavatmal/pink-bond-slowly-farmers-havoc/ 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी