अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने रेशनच्या लाभार्थींची फिराफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 15:13 IST2019-01-29T15:10:07+5:302019-01-29T15:13:42+5:30
स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशीनमुळे गरजुंना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाऱ्या लाभार्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वनवन भटकावे लागत आहे.

अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने रेशनच्या लाभार्थींची फिराफिर
जामनेर, जि.जळगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशीनमुळे गरजुंना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाऱ्या लाभार्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून वनवन भटकावे लागत आहे. तसेच दुष्काळी परिस्थितित आर्थिक संकटाला समोरा जावे लागत आहे.
लाभार्र्थींच्या चकरावर चकरा?
ई-पॉस हे इंटरनेटला संलग्र असल्याने रेशन दुकानदार व कार्डधारक यांची संपूर्ण माहिती पोर्टलवर उपलब्ध असून कार्डधारकाने खरेदी केलेल्या संपूर्ण धान्याचा तपशील विभागाच्या पोर्टलवर तत्काळ येतो. परंतु धान्य घेण्यास गेलेल्या लाभार्र्थींचे ठसे उमटत किंवा ई-पास मशीनमध्ये नाव दिसत नसल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानदार व तहसील कार्यलयात दर रोज चकरा माराव्या लागत आहे.
ठसे उमटत नाही
तालुक्यात सध्या सर्वच रेशनकार्डधारक लाभार्र्थींची पडताळणी सुरू आहे. तालुक्यात अंत्योदय योजनेचे १० हजार ५१०, प्राधान्य कुटुंब योजनेचे ३७ हजार ५३९, केशरी कार्डधारक २३ हजार व पांढरे कार्डधारक दोन हजार लाभार्थी आहेत.
परिवारातील प्रत्येक लाभार्र्थींचे रेशनकार्डमध्ये संख्येप्रमाणे आधार कार्डची झेरॉक्स व ई-पॉस मशीनवर ठसे घेतले जात असून, त्यावरसुद्धा काहींचे ठसे उमट नाही. तसेच आॅनलाइन सॉफ्टवेअर घोळामुळे लाभार्थींचा आधारकार्ड नंबर मॅच होत नाही. परिणामी लाभार्र्थींना अडचण निर्माण होऊन त्यांना त्यांचा हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे.
दररोज तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर कार्डधारक लाभार्थी आपली मोलमजुरी सोडून भाडे खर्च करून तहसील कार्यालय गाठत असून, मात्र निराश होऊन त्यांना माघारी जावे लागत आहे. वरिष्ठांंनी या समस्येकडे लक्ष देऊन ही फिराफिर थांबवावी, अशी मागणी लाभार्थी करीत आहेत.