पाण्याअभावी एक हेक्टर डाळींब बाग उपटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:06 IST2019-07-17T18:05:05+5:302019-07-17T18:06:37+5:30
ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.

पाण्याअभावी एक हेक्टर डाळींब बाग उपटला
विजय पाटील
आडगाव, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : ऐन दुष्काळात पाण्याचे टँंकर टाकून जगविलेली डाळींबाची बाग पावसाळा सुरू होऊन अर्धा पावसाळा संपत आला तरी आडगावसह परिसरात अजूनपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. त्यातच दैनंदिन टँकरचा खर्च तसेच रोज कुठून पाणी आणावे या नैराश्यातून आडगाव येथील शेतकरी सुभाष हिलाल पाटील या शेतकऱ्याने १७ रोजी ऐक हेक्टरवरील (अडीच ऐकर) डाळींबाचा बागच उपटून फेकण्याचा निर्णय घेतला.
घरातील लहान बाळाला जसे जीव लावतात तसे त्यांनी डाळींबाच्या बागेला जीव लावला. बाग जतन करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. ऐक/ दोन वेळेस त्यांनी बहार पण धरला. त्यात पहिल्यांदा चांगले यश आले. दुसºया वेळेसबाजारभावामुळे बराबरी झाली. पाण्याअभावी बहुतेक शेतकऱ्यांंनी उन्हाळ्यातच बागा उपटून फेकल्या. परंतु सुभाष पाटील यांनी धीर न सोडता तीव्र दुष्काळातदेखील या विहिरीवरून, त्या विहिरीवरून पाणी आपल्या स्वत:च्या विहिरीत टाकून बाग जगविण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु कालांतराने त्या विहिरीदेखील दोन अडीच महिन्यांपासून आटल्याने शेवटी त्यांनी दोन महिन्यांपासून टँंकरने विहिरीत पाणी टाकून बाग जिवंत ठेवली. आज पाऊस येईल, उद्या पाऊस येईल ही आशा ठेऊन अर्धा पावसाळा झाला तरीदेखील वरून राजा येण्याचे नाव न घेत नसल्याने डाळींबाच्या ऊत्पन्नांपेक्षाा नुसते पाण्यावरच जास्त खर्च होत असल्याने अजून त्यावर वेगवेगळ्या फवारण्या हा खर्च असह्य झाल्याने मोठ्या जड अंतकरणाने १७ रोजी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पूर्ण बागच उपटून फेकली.