भाव नसल्याने शेतकऱ्याने उभी मिरची फेकली उपटून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:21 IST2021-08-25T04:21:51+5:302021-08-25T04:21:51+5:30
फोटो २५ एचएसके ०२ कुऱ्हाड खुर्द येथे उपटून फेकलेली मिर्ची (सुनील लोहार) कुऱ्हाड, ता. पाचोरा : कुऱ्हाड ...

भाव नसल्याने शेतकऱ्याने उभी मिरची फेकली उपटून
फोटो २५ एचएसके ०२
कुऱ्हाड खुर्द येथे उपटून फेकलेली मिर्ची (सुनील लोहार)
कुऱ्हाड, ता. पाचोरा : कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी शिवाजी गोविंदा शेजूळ या शेतकऱ्याने भाव मिळत नसल्याने त्याच्या कोकडी शिवारातील एक एकरवरील मिरचीचे उभे पीक उपटून फेकले.
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव हे हिरव्या मिरचीच्या उत्पादनाच्या बाबतीत प्रसिद्ध आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना मिरचीचा चांगला भाव मिळाल्याने मिरची उत्पादनातून शेतकऱ्यांनी लाखो रुपये कमविले होते. त्याच अनुषंगाने यावर्षी परिसरात मिरचीची लागवड दुप्पट करीत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु मिरचीला ठोक भाव हा केवळ तीन ते चार रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्च व तोडणीची मजुरी सुद्धा निघत नसल्यामुळे या शेतकऱ्याने आपली मिरची उपटून फेकली. या कारणाने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येत आहे.