जामनेर तालुक्यातील पाळधी येथे विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजारामुळे मूत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 15:46 IST2017-11-20T15:41:43+5:302017-11-20T15:46:08+5:30
ईश्वर नाना परदेशी (वय १२) या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात मूत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली.

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजारामुळे मूत्यू
ठळक मुद्देईश्वर परदेशी हा तीन ते चार दिवसांपासून आजारीप्रकृती खालावल्याने जळगावातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारउपचारा दरम्यान रविवारी रात्री झाला मृत्यू
आॅनलाईन लोकमत
पाळधी ता.जामनेर : येथील रहिवासी ईश्वर नाना परदेशी (वय १२) या विद्यार्थ्याचा डेंग्यू सदृश्य आजाराने उपचारा दरम्यान खाजगी रुग्णालयात मूत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजता घडली.
पाळधी येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असलेला ईश्वर नाना परदेशी हा विद्यार्थी गेल्या ३ ते ४ दिवसापासून आजारी होते. पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे एका खासगी रूग्णालय दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना असतांना रविवारी रात्री ११ वाजता मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.