जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे कांदेबागचे उत्पादन घटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:54 IST2018-04-29T22:54:53+5:302018-04-29T22:54:53+5:30
विमा कंपन्यांनी लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी

जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे कांदेबागचे उत्पादन घटणार
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२९ : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा कहर वाढला आहे. त्यामुळे केळीच्या कांदेबागला मोठ्या प्रमाणात फटका बसला असून, यंदा केळीच्या उत्पादनात ३० ते ४० टक्कयांची घट होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांककडून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या शेतकºयांनी कांदेबागची लागवड केली आहे. मात्र, जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशाच्या पार गेल्यामुळे केळीच्या कोवळी पाने जळून जात आहेत. यामुळे केळीच्या खोडाच्या वाढीवर परिणाम होत आहे. त्यातच बेमोसमी केळीच्या बागावर देखील तापमानाचा परिणाम जाणवत असून, जास्तीच्या तापमानामुळे केळीची झाडे आणि केळी काळी पडत आहेत. झाडापासून परिपक्व न झालेले केळीचे घड आपोआप वेगळे होत आहेत. तर काही झाडे पाणी असूनही सुकत आहेत व आवश्यक वाढ देखील होणार नाही. त्यामुळे शेतकºयांचे प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच केळीच्या वजनात घट होत असल्याची माहिती शेतकºयांनी दिली आहे.