ग्रामपंचायत निवडणुकीमुळे १५ जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:13 IST2021-01-09T04:13:22+5:302021-01-09T04:13:22+5:30

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या शुक्रवारी (दि.१५) आयोजित ...

Due to Gram Panchayat elections, the examination on 15th January has been postponed | ग्रामपंचायत निवडणुकीमुळे १५ जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे १५ जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान असल्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांच्या शुक्रवारी (दि.१५) आयोजित ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मधील कला, विज्ञान व वाणिज्य पदवी, व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांतर्गत सत्र २, ४ व ६ या सत्रांतील बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन एमसीक्यू स्वरूपात दि. ५ जानेवारीपासून सुरू आहेत. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक-२०२० जाहीर झाली असून शुक्रवार, दि. १५ रोजी मतदान होणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थी व संबंधित घटक मतदानापासून वंचित राहू नये म्हणून दि.१५ जानेवारी रोजी विद्यापीठामार्फत आयोजित सर्व अभ्यासक्रमांची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, सदर दिवसाच्या अभ्यासक्रमनिहाय परीक्षांच्या तारखा लवकरच कळविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी. पी. पाटील यांनी कळविले आहे.

Web Title: Due to Gram Panchayat elections, the examination on 15th January has been postponed