शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

जळगावात निपाहची धास्ती अन् वटवाघळांची वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 2:35 PM

जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शिरकाव नाही मात्र दक्षता म्हणून आरोग्य केंद्रांना सूचनाजळगावातील शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्तीउद्यानात येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. दरम्यान, जिल्ह्यात निपाहचा कोठेही शिरकाव नसला तरी दक्षता म्हणून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्कतच्या सूचना दिल्या आहेत.केरळमध्ये निपाह व्हायरची लागण होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. बाधीत वटवाघळांच्या मूत्र व लाळेमुळे हा व्हायरस पसरत असल्याचे समोर आले आहे, असे असले तरी जळगावात एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने असलेल्या वटवाघळांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. नेहमी अबाल वृद्धांची वर्दळ असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील झाडांवर वटवाघळांची मोठी संख्या दिसून येत आहे. बाधीत वटवाघळाच्या लाळेमुळेच हा व्हायरस पसरण्याची धास्ती असल्याने उपाययोजेची मागणी होत आहे.धुळे जिल्ह्यात घेतले नमुने‘निपाह’च्या पार्श्वभूमीवर शेजारील धुळे जिल्ह्यात खबरदरी म्हणून वराहांचे रक्तनुमने घेण्यात आले आहेत. तसेच वटवाघूळ असलेल्या झाडांखाली चुना टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र जळगावात वटवाघूळ असलेल्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही.आरोग्य केंद्रांना सतर्कतेच्या सूचना‘निपाह’ व्हायरसचा जिल्ह्यात कोठेही शिरकाव नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. असे असले तरी दक्षता म्हणून जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, शहरातील स्थितीबाबत व उपाययोजनांबाबत मनपाचे आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.हा व्हायरस थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्कात आल्यास होऊ शकतो.तो मेंदूवर थेट हल्ला करतो त्यामुळे ताप येणे थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षणे आढळतात.लक्षण आढळताच तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील २४ ते ४८ तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.अनेक रूग्णांमध्ये मेंदूशी निगडीत, श्वासोश्वासाशी निगडीत आणि हृदयाच्या ठोक्याशी निगडीत समस्या वाढल्याचे आढळून येते.ताप, थकवा, शुद्ध हरपणे, चक्कर येणे, उलट्या होणे, मळमळणे, अस्वस्थ वाटणे ही लक्षणे ७ ते १० दिवस आढळतात.सुरूवातीच्या टप्प्यावर श्वासाशी संबंधित त्रास होतोसध्या या व्हायरसचा धोका टाळण्यासाठी कोणतेही औषध, इंजेक्शन उपलब्ध नाही.अशी घ्या काळजीपडलेली फळंं खाणे टाळा. कारण वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांद्वारे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो.संसर्ग झालेले डुक्कर, वटवाघुळ किंवा माणसांच्या थेट संपर्कात येणे टाळा.वैद्यकीय मदत करणाºया व्यक्तींनीही रूग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी (ग्लोव्ह, मास्क) घेणे आवश्यक आहे.मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करा.अस्वस्थ वाटत असल्यास संबंधित चाचण्या करणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणूJalgaonजळगाव