जळगाव : समता नगरातील वंजारी टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या प्रवीण शिवाजी सनांसे (वय २७) या तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. प्रवीण याचे कपडे, चप्पल व पाकीट तलावाकाठी गणेश घाटाजवळ आढळून आले आहेत. तो शनिवारी सायंकाळपासून घरातून गायब असल्याने ही आत्महत्या असावी अशीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रवीण सनांसे हा शनिवारी सायंकाळपासून घरातून निघाला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मोठा भाऊ दीपक व अन्य नातेवाईकांनी त्याचा रात्रभर शोध घेतला. रविवारी सकाळी फिरायला गेलेल्या एका पोलिसाला तलावाकाठी गणेश घाटावरील पायºयांवर त्याचे कपडे, चप्पल व पाकीट आढळून आले.समता नगरातील प्रवीण गायब असल्याचे समजल्याने तेथील तरुणांनी तलावाकडे धाव घेतली. तलावात प्रवीणचा शोध घ्यायला सुरुवात झाली. दीड तासानंतर प्रवीणचा मृतदेह लागला.प्रवीण हा अविवाहित होता. फर्निचर कामाचा तो उत्कृष्ट कारागीर होता. यंदा लग्न करण्याचे नियोजन होते, त्यासाठी कुटुंबाकडून स्थळ पाहण्याचेही काम सुरु झाले होते. मोठा भाऊ दीपक व दोन बहिणी अविवाहित आहेत. वडील सैन्य दलात होते.
जळगावातील मेहरुण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 16:28 IST
समता नगरातील वंजारी टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या प्रवीण शिवाजी सनांसे (वय २७) या तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. प्रवीण याचे कपडे, चप्पल व पाकीट तलावाकाठी गणेश घाटाजवळ आढळून आले आहेत. तो शनिवारी सायंकाळपासून घरातून गायब असल्याने ही आत्महत्या असावी अशीही शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगावातील मेहरुण तलावात तरुणाचा बुडून मृत्यू
ठळक मुद्देआत्महत्येचा संशय तलावाकाठी आढळले कपडे व पाकीट अकस्मात मृत्यूची नोंद