लग्नापूर्वीच जळगावात तरूणाचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: May 23, 2017 15:38 IST2017-05-23T15:38:22+5:302017-05-23T15:38:22+5:30

तरुण रविवार झाला होता बेपत्ता.नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

Due to the drowning of youth in Jalgaon before marriage | लग्नापूर्वीच जळगावात तरूणाचा बुडून मृत्यू

लग्नापूर्वीच जळगावात तरूणाचा बुडून मृत्यू

>ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.23- तांबापुरा येथील बिलमिल्ला चौकातील सलमान बाबु पटेल (वय- 25) या तरुणाचा मेहरूण बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 9 वाजता उघडकीस आली आह़े रविवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता़ दोन दिवसानंतर तलावात त्याचा मृतदेह आढळून आल्याने नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून चौकशीची मागणी केली होती़ 25 मे ला त्याचे लग्न होते, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने जिल्हा रूग्णालयात कुटुंबियांनी आक्रोश केला़
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान याने नवीन कपडे घेण्यासाठी पैशाची मागणी केली होती. त्यानुसार वडीलांनी त्याला पाच हजार रूपये दिल़े रविवार, 21 रोजी सायंकाळी 4 वाजता घरून निघाला पुन्हा परतला नाही़ सोमवारी वडील बाबू पटेल व बहिणी यास्मिन यांनी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.
मंगळवारी मेहरूण तलाव परिसरात औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक पवार हे गस्तीवर असताना त्याना तलावात एक मृतदेह दिसून आला. चौकशी केल्यानंतर तो सलमान पटेल याचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, नातेवाईकांनी सलमान याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

Web Title: Due to the drowning of youth in Jalgaon before marriage