पाळधी, ता.जामनेर : हिंगणे बुद्रुक येथील गुराखी बद्रीसिंग वाल्मिक राठोड (वय -४०) यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.हिंगणे बुद्रुक येथील गुराखी बद्रीसिंग राठोड हे नेहमीप्रमाणे आपले गुरुवारी गुरे चारण्यासाठी वाघूर धरणालगत गेले होते. त्यांची एक गाय वाघूर धरणातील पाण्यात फसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते पाण्यात उतरले. त्यांना पोहता येत नव्हते. त्यामुळे गाय वाचविण्याच्या प्रयत्नात ते स्वत:चाच जीव गमावून बसले.शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास गावातीलच पट्टीचे पोहणारे दिलीप सखाराम भिल, धुरवास मागो मोरे, नितीन कोळी,पवन इंदलकर यांच्या सहकार्याने मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते जगदीश सूर्यवंशी यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. उपसरपंच सुपडू बावस्कर व पोलीस पाटील यांनी रात्रभर घटनास्थळी पहारा दिला व मदत केली.डॉ.चांदा यांच्या खबरवरून जामनेर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मूत्यू नोंद करण्यात आली आहे. तपास विनोद पाटील करीत आहेत.
जामनेर तालुक्यात धरणात बुडून गुराख्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 21:45 IST
हिंगणे बुद्रुक येथील गुराखी बद्रीसिंग वाल्मिक राठोड (वय -४०) यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
जामनेर तालुक्यात धरणात बुडून गुराख्याचा मृत्यू
ठळक मुद्देहिंगणे बुद्रुक येथील घटनागाळामुळे मृतदेह काढण्यास अडचणजामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद