शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

भाविकांच्या गर्दीमुळे भिमाशंकरला वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:52 IST

तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा. मंदिरात दर्शनासाठी अर्धा किलोमिटरची रांग

ठळक मुद्देदहिसरच्या कुटुंबियांना ‘लोकमत’ चा मदतीचा हात...सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने संतापवाहनतळ भरल्याने रहदारीचा खोळंबा

कुंदन पाटीलजळगाव,दि.२५ : अचानक उसळलेल्या देशभरातील भाविकांच्या गर्दीमुळे भिमाशंकर येथे सोमवारी गर्दी झाली. वाहनांची तब्बल तीन किलोमिटरपर्यंत रांग लागली असतांना मंदिर परिसरात देखील दर्शनासाठी तब्बल अर्धा किलोमिटरची रांग असल्याने अनेक भाविकांना माघारी फिरावे लागले.सोमवारी पहाटेपासून भिमाशंकरच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरु झाला. अवघ्या काही मिनिटातच भिमाशंकर येथील वाहनतळ फुल्ल झाले. त्यानंतर आलेल्या वाहनांना पार्किंगसाठी जागा न मिळाल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. तब्बल तीन किलोमीट अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. बºयाच वेळेनंतरही वाहतुककोंडी सुटत नसल्याचे पाहून भाविकांनी पायपीट सुरु केली. शर्थीच्या प्रयत्नांनी मंदिर गाठल्याचा आनंदही क्षणिक ठरला.मंदिराबाहेर भाविकांच्या गदीर्ने अर्धा किलोमीटरपर्यंतचे अंतर व्यापले होते. दर्शनकोंडी पाहून वृद्ध भाविकांचाही नाइलाज झाला आणि भिमाशंकराचे ‘दूरदर्शन’ घेत अनेकांनी परतीचा प्रवास सुरु केला. त्यानंतरही भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतुककोंडीने वाहनांना परतीचा प्रवासही अशक्य बनला. तेव्हा भाविकांनी गाडीत बसूनच वाहतूक सुरळीत होण्याची तासोंतास प्रतीक्षा करत ताटकळत बसावे लागले.दहिसरच्या कुटुंबियांना ‘लोकमत’ चा मदतीचा हात...सायंकाळ झाल्यावरही दर्शन होत नाही म्हटल्यावर दहिसरचे गुजराथी कुटुंबिय हतबल झाले आणि त्यांनी दुरवरुनच दर्शन घेत परतीचा प्रवास सुरु केला. मंदिरापासून दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करता करता नाकेनऊ आलेल्या दोघा वृद्ध महिलांचा नाईलाज झाला आणि त्यांनी परतीचा प्रवास करणाºया वाहनधारकांकडे मदत मागायला सुरुवात केली. वाहतुककोंडीत कुठलाही चालक मदतीसाठी सरसावला नाही. तेव्हा ‘लोकमत’ ने त्यांना हात देत त्यांच्या खासगीवाहनांपर्यंत पोहचते केले.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने संतापभिमाशंकर पोहोचण्याआधीचा चार किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात आहे. आधीच वाहतुकीची कोंडी झाली असताना अनेकांच्या वाहनांना खड्ड्यांशी सामना करावा लागला. त्यात काही वाहनांचे नुकसानही झाले.

 सलगच्या सुट्या आणि अनपेक्षित गर्दीमुळे भाविकांची गैरसोय झाली.काही चालकांच्या बेशिस्तपणामुळेही वाहतुकी कोंडी निर्माण झाली. त्यावर उपाययोजना अंमलात आणण्याचे काम सुरु आहे.-राम पठारे, पोलीस उपविभागीय अधिकारी, खेड, पुणे

टॅग्स :BhimashankarभीमाशंकरPuneपुणेJalgaonजळगाव