वाहतुकदारांच्या संपामुळे जळगावातील दाणाबाजारात आवक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 12:50 IST2018-07-24T12:50:19+5:302018-07-24T12:50:56+5:30

परराज्यातून माल येईना

Due to the collision of the freight, the incessant jam in the Jalgaon granary | वाहतुकदारांच्या संपामुळे जळगावातील दाणाबाजारात आवक ठप्प

वाहतुकदारांच्या संपामुळे जळगावातील दाणाबाजारात आवक ठप्प

ठळक मुद्देजळगावात हमाल बांधव अडचणीत५०० वाहतूकदार सहभागी

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून विविध मागण्यासांठी देशभरात मालवाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे, दररोज दाणाबाजारात मोठ्या प्रमाणावर बाहेरुन येणाऱ्या मालाची आवक ठप्प झाली आहे. परिणामी संपाचा सर्वाधिक परिणाम हमाल बांधवाच्या रोजगारावर झाला असून, ट्रान्सपोर्टनगरातील सुमारे २५० ते ३०० हमाल बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
५०० वाहतूकदार सहभागी
डिझेलच्या वाढलेल्या किंमती, ई-वे बिल मधील जाचक अटी व इतर मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस नवी दिल्लीतर्फे २० जुलै पासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जळगाव शहरातील ३०० माल वाहतूकदार व इतर तालुक्यांमधील २०० असे एकूण ५०० माल वाहतूकदार सहभागी झाले आहेत. देशभरात हा संप सुरु असल्याने, दाणा बाजारातील विविध व्यापाºयांचा राजस्थान, गुजराथ, पंजाब, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या भागातून दररोज १५ ते २० ट्रकभरुन माल येत असतो. या मालाची आवक पूर्णत: ठप्प झाली आहे.
सध्या स्थितीला काही व्यापाºयांकडे दोन ते तीन दिवस पुरेल इतकाच वस्तूंचा साठा आहे. जर संप अशाच प्रकारे लांबत राहिल्यास, मालाचा तुटवडा जाणवायला सुरुवात होईल.
हमाल बांधवांचा तुटपूंजा रोजगारही बुडाला
दाणा बाजारासह ट्रान्सपोर्टनगरात बाहेरुन येणाºया मालाची वाहतूक करणारे सुमारे २५० ते ३०० हमाल बांधव आहेत. दररोज एका हमालाला सायंकाळपर्यंत २०० ते ३०० रुपये हमाली मिळते. या तुटपुंज्या हमालीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु असतो. मात्र, चार दिवसांपासून मालवाहतूकदारांच्या बेमुदत संपाचा सर्वाधिक परिणाम हमाल बांधवावर होत असून, त्यांचा तुटपूंजा रोजगारही बुडत आहे. दररोज सकाळपासूनच हमाल बांधव या ठिकाणी येऊन, संप मिटण्याची वाट पाहत आहेत.

माल वाहतूकदारांच्या संपामुळे परराज्यातून येणाºया मालाची आवक पूर्णत: ठप्प आहे. आजबाजूच्या जिल्हयांमधूनच मालाची आवक सुुरु आहे. मात्र, येत्या दोन ते तीन दिवसात संप मिटणे गरजेचे आहे.अन्यथा मालाचा तुटवडा जाणवायला सुरुवात होईल.
-प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणा बाजार असोसिएशन.

युनियनच्या पदाधिकाºयांची नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे बैठक झाली.त्यात मात्र मागण्या संदर्भात कुठलाही तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे.
-पप्पू बग्गा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन

Web Title: Due to the collision of the freight, the incessant jam in the Jalgaon granary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.