सुकी धरण ओव्हर फ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:19 IST2021-09-06T04:19:25+5:302021-09-06T04:19:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सावखेडा, ता. रावेर : रावेर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले सुकी (गारबर्डी) धरण हे ५ रोजी सकाळी ९ ...

Dry dam overflow | सुकी धरण ओव्हर फ्लो

सुकी धरण ओव्हर फ्लो

लोकमत न्यूज नेटवर्क

सावखेडा, ता. रावेर : रावेर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले सुकी (गारबर्डी) धरण हे ५ रोजी सकाळी ९ वाजता डोंगराळ भागात झालेल्या पावसामुळे १०० टक्के पूर्ण भरले असून, सध्या धरणातून २४.३० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सुकी (गारबर्डी) धरण रावेर तालुक्यातील मुख्य धरण असल्याने धरण भरल्याने तालुक्यात व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सुकी (गारबर्डी) धरण भरल्याने आता सुकी नदीलादेखील भविष्यात धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू राहणार असल्याने परिसरातील शेतकरी आनंदित झाला आहे.

सुकी (गारबर्डी) धरण भरल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बऱ्याच गावांना या धरणाचा मोठा फायदा होतो. सिंचनासाठीही शेतकऱ्यांना या पाण्याचा मोठा फायदा होतो. सुकी धरण भरले की सुकी नदीलाही बऱ्याच महिन्यांपर्यंत पाणी वाहत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष बऱ्याच दिवसांपासून सुकी धरण केव्हा भरणार याच्याकडे लक्ष लागले होते; परंतु आता सुकी धरण भरल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर झाली आहे. सुकी मध्यम प्रकल्पाचा ५ रोजीचा एकूण पाऊस ३४०, आजचा पाऊस ३०, आजचा उपयुक्त साठा ५०.१६ दलघमी, ओरफ्लो १ सेंटीमीटर असा नोंदविला गेला असल्याचे शाखाधिकारी सुकी मध्यम प्रकल्प यांनी सांगितले.

सुकी नदी पात्राजवळील लोकांनी सावधगिरी बाळगावी. नदीचा विसर्ग आणखी पुढील काळात वाढू शकतो, अशी माहिती सुकी मध्यम प्रकल्प शाखाधिकारी अजय जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

-अजय जाधव शाखाधिकारी, सुकी मध्यम प्रकल्प

मागील वर्षी सुकी धरण जुलै महिन्यात भरले होते; परंतु यावर्षी कमी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली; परंतु ५ रोजी सुकी धरण डोंगराळ भागात झालेल्या पावसाने सकाळी ९ वाजता १oo टक्के भरले असून, सध्या धरणातून २४.३० क्युसेक पाण्याचा विसर्ग धरणातून सुरू आहे, तसेच पुढील काळात पाण्याचा विसर्ग आणखी वाढू शकतो, तरी नदी पात्राजवळील लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात येत आहे. लोकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Dry dam overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.