भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन जण अटकेत
By चुडामण.बोरसे | Updated: March 20, 2024 14:06 IST2024-03-20T14:05:11+5:302024-03-20T14:06:01+5:30
दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन जण अटकेत
भुसावळ (जि.जळगाव) : भुसावळात मंगळवारी रात्री १० वाजता पोलिसांनी एका हाॕटेलवर धडक कारवाई करीत तब्बल ७२ लाख रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले. यात १८ प्रकारचे ड्रग्ज आहेत. दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
कुणाल भरत तिवारी (३०, रा.तापी नगर, भुसावळ) आणि जोसेफ जाॕन(३२, रा. कंटेनर यार्ड, भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून कोकेन, चरस, गांजा, हेराॕईन, केटामाईन, एमडी असे १८ प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.