चारचाकीला धडक दिल्याने चालकाला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:15 IST2021-03-07T04:15:23+5:302021-03-07T04:15:23+5:30

जळगाव : अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारची पुढे चालणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक बसली. हा अपघात शनिवारी सकाळी ...

The driver was beaten to death after hitting the four-wheeler | चारचाकीला धडक दिल्याने चालकाला बेदम मारहाण

चारचाकीला धडक दिल्याने चालकाला बेदम मारहाण

जळगाव : अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या कारची पुढे चालणाऱ्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक बसली. हा अपघात शनिवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास शिरसोली रस्त्यावर घडला. या अपघातानंतर चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली.

भालचंद्र उत्तम पाटील (रा. एकलग्न) हे बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत वाहनावर चालक म्हणून कामाला आहेत. शनिवारी सकाळी ते शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स येथील कॅन्टीनमध्ये डबे घेण्यासाठी आले होते. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास ते वाहनात डबे भरून कंपनीच्या दिशेने निघाले. गुंजन मंगल कार्यालयाजवळून जात असताना पुढच्या वाहनाने अचानक ब्रेक मारल्यामुळे त्यांनी त्यांच्या वाहनाचा ब्रेक मारला. त्यामुळे मागून भरधाव येत असलेली कार त्यांच्या वाहनाला जोरदार धडकली़

कपडे फाटेपर्यंत मारहाण

दरम्यान, अपघात झाल्यानंतर कारमधील तीन जण खाली उतरले व त्यांनी भालचंद्र पाटील यांना मारहाण केली. यावेळी त्यांचे कपडे फाटले. मारहाण केल्यामुळे पाटील हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी कंपनीतील सुरक्षा रक्षकांना बोलावून एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. नंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. या प्रकरणी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Web Title: The driver was beaten to death after hitting the four-wheeler