जळगाव येथे दुचाकीस्वाराला वाचविताना रिक्षा उलटली, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:24 IST2017-12-12T12:22:19+5:302017-12-12T12:24:44+5:30

जिल्हा रुग्णालयात उपचार

The driver sustained injuries in jalgaon | जळगाव येथे दुचाकीस्वाराला वाचविताना रिक्षा उलटली, चालक जखमी

जळगाव येथे दुचाकीस्वाराला वाचविताना रिक्षा उलटली, चालक जखमी

ठळक मुद्देतत्काळ ब्रेक लावल्याने रिक्षा उलटली घटनास्थळावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 12- समोरुन येणा-या दुचाकीस्वारास वाचविताना रिक्षा उलटल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली. या अपघातात रिक्षाचालक संजय यशवंत जाधव (वय 40, रा. सरस्वती नगर, जळगाव) हे गंभीर जखमी झालेले आहेत. एमआयडीसी पोलिसांनी त्यांना तत्काळ त्यांच्या सरकारी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
संजय जाधव हे त्यांच्या रिक्षाने (क्र.एम.एच.19-6869) रेमंड चौकाकडून शहराकडे येत असताना रिक्षात पेट्रोल भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील पेट्रोल पंपाकडे त्यांनी वळण घेतले. त्यावेळी समोरुन अचानक दुचाकीस्वार आला त्याला वाचविण्याच्या प्रय}ात त्यांनी तत्काळ ब्रेक लावला असता रिक्षा उलटली व जाधव हे गंभीर जखमी झाले. 
घटनास्थळावर गर्दी होऊन वाहतूक कोंडी झाली होती. जखमीच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत रिक्षाचालक जाधव यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. संजय जाधव यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे. तर रिक्षाचे देखील नुकसान झाले आहे. 

Web Title: The driver sustained injuries in jalgaon