शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

ट्रक आणि डंपर अपघातात चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 20:38 IST

साकेगाव : जोरदार धडकेमुळे झाला प्रचंड आवाज :  क्लीनर गंभीर जखमी

भुसावळ : शहराजवळील साकेगावच्या पुढे  महामार्गावर मुंजोबा मंदिराजवळ डंपर  डांबराच्या टँकरची समोरासमोर धडक झाल्याने यात साकेगावचा युवक ठार तर क्लीनर जखमी झाला, ही घटना सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. 

साकेगाव महामार्गावर भुसावळकडून जळगावकडे डंपर क्रमांक एमएच-१९- झेड- ३१२३ जात असताना त्याच वेळेस डावी बाजू सोडून विरुद्ध दिशेने  जळगावकडून भुसावळकडे  भरधाव डंपरची (एमएच-१८- बीए-४१८८) ला जोरदार धडक  झाली. ही  धडक इतकी जोरात होती की पहाटे प्रचंड आवाजाने  घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या ढाब्यावरील कर्मचारी गाढ झोपेतून खडबडून उठले, या अपघातामुळे डंपर व ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झालेला आहे. 

मला वाचवा म्हणत साकेगावच्या युवकाने सोडले  प्राणअपघात घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच साकेगाव येथून अपघातस्थळी नागरिकांचा जथ्था  लगेचच रवाना झाला. यामध्ये साकेगावचा डंपरचालक देवानंद नथू पाटील (३५) हा डंपरच्या  केबिनमध्ये अडकून गेला होता, त्यास जेसीबीद्वारे मोठ्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले, रक्तबंबाळ स्थितीत  देवानंद  म्हणत होता.  गावातील मंगल कोळी, गजानन कोळी, गजानन जवरे यांनी देवानंदला दुचाकीवर बसवून गोदावरी रुग्णालयात नेले. मात्र त्याच्या गुप्तांगावर जोराने मार लागल्यामुळे उपचारादरम्यान बोलता-बोलता त्याचे प्राण गेले. साकेगावचा रहिवासी असलेला क्लीनर विकास युवराज कोळी यालाही जबर मार लागला असून पायामध्ये तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. दरम्यान, समोरासमोर वाहनांची टक्कर झाल्यामुळे एकतर्फी महामार्ग पूर्ण बंद पडला होता. साकेगावचे रोशन कोळी, ललित धनगर याशिवाय  अनेक ग्रामस्थांनी या वेळी मदतकार्य केले. 

साकेगावात  मृत्यूची मालिका सुरूच

गेल्या पंधरा दिवसांमध्ये साकेगावात कोरोनासह विविध आजार आणि वृद्धापकाळाने ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय आजच्या अपघाताच्या घटनेमुळे त्यात आणखीन एक भर पडली आहे.