ट्रक आणि डंपर अपघातात चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 08:38 PM2021-03-26T20:38:09+5:302021-03-26T20:38:15+5:30

साकेगाव : जोरदार धडकेमुळे झाला प्रचंड आवाज :  क्लीनर गंभीर जखमी

Driver killed in truck and dumper accident | ट्रक आणि डंपर अपघातात चालक ठार

ट्रक आणि डंपर अपघातात चालक ठार

googlenewsNext

भुसावळ : शहराजवळील साकेगावच्या पुढे  महामार्गावर मुंजोबा मंदिराजवळ डंपर  डांबराच्या टँकरची समोरासमोर धडक झाल्याने यात साकेगावचा युवक ठार तर क्लीनर जखमी झाला, ही घटना सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. 

साकेगाव महामार्गावर भुसावळकडून जळगावकडे डंपर क्रमांक एमएच-१९- झेड- ३१२३ जात असताना त्याच वेळेस डावी बाजू सोडून विरुद्ध दिशेने  जळगावकडून भुसावळकडे  भरधाव डंपरची (एमएच-१८- बीए-४१८८) ला जोरदार धडक  झाली. ही  धडक इतकी जोरात होती की पहाटे प्रचंड आवाजाने  घटनास्थळाच्या बाजूला असलेल्या ढाब्यावरील कर्मचारी गाढ झोपेतून खडबडून उठले, या अपघातामुळे डंपर व ट्रकच्या समोरील भागाचा चुराडा झालेला आहे. 

मला वाचवा म्हणत साकेगावच्या युवकाने सोडले  प्राण
अपघात घडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच साकेगाव येथून अपघातस्थळी नागरिकांचा जथ्था  लगेचच रवाना झाला. यामध्ये साकेगावचा डंपरचालक देवानंद नथू पाटील (३५) हा डंपरच्या  केबिनमध्ये अडकून गेला होता, त्यास जेसीबीद्वारे मोठ्या परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले, रक्तबंबाळ स्थितीत  देवानंद  म्हणत होता.  गावातील मंगल कोळी, गजानन कोळी, गजानन जवरे यांनी देवानंदला दुचाकीवर बसवून गोदावरी रुग्णालयात नेले. मात्र त्याच्या गुप्तांगावर जोराने मार लागल्यामुळे उपचारादरम्यान बोलता-बोलता त्याचे प्राण गेले. साकेगावचा रहिवासी असलेला क्लीनर विकास युवराज कोळी यालाही जबर मार लागला असून पायामध्ये तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. दरम्यान, समोरासमोर वाहनांची टक्कर झाल्यामुळे एकतर्फी महामार्ग पूर्ण बंद पडला होता. साकेगावचे रोशन कोळी, ललित धनगर याशिवाय  अनेक ग्रामस्थांनी या वेळी मदतकार्य केले. 

साकेगावात  मृत्यूची मालिका सुरूच

गेल्या पंधरा दिवसांमध्ये साकेगावात कोरोनासह विविध आजार आणि वृद्धापकाळाने ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे, याशिवाय आजच्या अपघाताच्या घटनेमुळे त्यात आणखीन एक भर पडली आहे.

Web Title: Driver killed in truck and dumper accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.