चाळीसगावला काँग्रेसची ‘शक्ती’ अ‍ॅपवर नोंदणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 17:16 IST2018-07-29T17:16:09+5:302018-07-29T17:16:39+5:30

पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

 Drive campaign for Congress 'power' in Chalisgaon | चाळीसगावला काँग्रेसची ‘शक्ती’ अ‍ॅपवर नोंदणी मोहीम

चाळीसगावला काँग्रेसची ‘शक्ती’ अ‍ॅपवर नोंदणी मोहीम

चाळीसगाव,जि.जळगाव : काँग्रेस हा तळागाळात रुजलेला जुना पक्ष असून, बुथनिहाय कार्यकर्त्यांचे जाळे ही पक्षाची जमेची बाजू आहे. यासाठी बुथ कमिट्यांनी सक्रिय होऊन ‘शक्ती’ अ‍ॅपवर कार्यकर्त्यांची नोंदणी करावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष अनिल निकम व शहाराध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केले.
रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शहर व तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आर्किटेक्ट धनंजय चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.
बुथनिहाय आढावादेखील घेण्यात आला. शक्ती अ‍ॅपवर कार्यकर्त्यांची याप्रसंगी नोंदणीही करण्यात आली.
प्रास्ताविकात देवेंद्र पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.
जिल्हा उपाध्यक्ष अशोक खलाणे, अ‍ॅड. वाडिलाल चव्हाण, माजी आमदार अ‍ॅड. ईश्वर जाधव, रवींद्र जाधव शब्बीर शेख, भागवत पाटील, कैलास पाटील, शालिक पाटील, समीर शेख, अनिल वाघ, कालिदास मगर, बापूराव राणे, विश्वजित नायक, पुंडलिक राठोड, रुमदेव चव्हाण, दिलीप चव्हाण, शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.

Web Title:  Drive campaign for Congress 'power' in Chalisgaon