शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खपणाऱ्यांच्या तपोभूमीवर स्वप्नेच बंदिस्त होतील, तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 00:40 IST

शुभेच्छा कार्ड या सदरात ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत अभ्यासक जयंत पाटील...

या शुभेच्छा कार्डात प्रामाणिकपणा आणि सुंदरता हा विषय आहे़विठ्ठलाच्या काळ्याश्यार मूर्तीला तुकाराम महाराज, सुंदर ते ध्यान उभें विटेवरी! करकटावरी ठेवूनिया ।।१।। असे म्हणतात.मेंढ्या राखणारा एखादा काळ्याशार वर्णाचा धनगर त्या काळ्या शिवारातून उगवून आला आहे, असेच वाटते़ तोही त्या विठ्ठलासारखाच सुंदर आहे़ मी आनंदवनात असताना हेमलकशाला अनेकदा गेलेलो आहे़आदिवासी गोंंड-माडिया स्त्रिया पाहिल्या आहेत़ त्यांची त्वचा इतकी निर्मळ- जीवनधर्मी असते की, विचारू नका. आपल्या शहरी माणसांची सौंदर्य दृष्टी कॅलेंडरवरून तयार झालेली दिसते़ त्या स्त्रिया प्रत्येक ऋतू त्या ऋतूप्रमाणे भोगतात़ त्यांचे जगणेही तसेच स्वच्छ- प्रामाणिक.आनंदवनात फॉरेनची काही मंडळी तिकडच्या बिस्किटांचे डबे पाठवायचे. बाबा हेमलकशाला जायच्या वेळी तेथील मुलांसाठी ते डबे आठवणीने घ्यायचे़स्टुलावर मध्यभागी बिस्किटांचा डबा ठेवलेला असायचा. त्या डब्याभोवती वर्तुळ करून आदिवासी पुरूष, बायका, मुले, उभी राहायची. बाबा सांगायचे, प्रत्येकाने एक- एक बिस्किट घ्यायचे. या आज्ञेचे इतके प्रामाणिकपणे पालन व्हायचे की, विचारू नका़ एकाही स्त्री किंवा मुलाने दोन बिस्किटे उचलल्याचे कधीही दिसले नाही़अलिकडे आपला बनेलपणा- दाखविगिरी इतकी भीषण पातळीवर पोहचली आहे की, कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या गौरवाच्या जाहिराती काढून पाहाव्यात.दुसरी एक गोष्ट अशी पूर्वी माणसांना- तरूणांना घामाचा वास येत नव्हता का? मुंबई - पुण्यात तर घरात ए़ सी़, कार्यालयात ए़सी़ म्हणजे घाम येण्याचा प्रश्नच नाही़ आमचे मानराजपार्क किती छोटेसे. इथेदेखील अनेक घरात बाहेर जाण्यापूर्वी डिओ मारला जातो़ तेव्हा तर वास येतोच़ पण जेव्हा ते गाडीवर बसून हायवेकडे जातात तिथपर्यत तो वास येत राहतो़ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध एखाद्या ठिकाणी गेल्यावर पसरत नाही़ त्याच मंडळींना यांची गरज असाविशी वाटते़बाबा आमटेंनी या घामाला, कष्टकऱ्यांच्या घामाला स्वेद - रस म्हटले आहे़बाबांची कविता़-‘खपणाºयांच्या तपोभूमीवरश्रम- रसाचे सुगंधी गुत्तेझिंगलेल्यांनी आता गजबजून जावेत्याची चटक लागली तरजगणे हरवून बसलेलीकलेवरेही तेथे गर्दी करतीलप्रज्ञेच्या पुत्रांनी तेथे स्वप्नांना आकार येईलस्वेद-रसाची ही मद्यशाळा अल्पावधीत आटून जाईलअथवा खपणाºयांच्या तपोभूमीवरस्वप्नेच बंदिस्त होतीलम्हणून असे बिचकू नकाकारण जीवनाचे मेघ नेहमीच तुडुंब असतातआणि प्रज्ञा-पुत्रांच्या स्वप्नांनी बंदीस्तपणा स्वीकारण्याचा इतिहास नाही !-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव