शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

दुष्काळातही उजळली ‘सीताड’ची कूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 19:13 IST

यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही वनविभागाने शिवणी नजीकच्या जंगलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत तब्बल अडीच लाखांवर विविध वृक्षांच्या रोपांची जतन केली आहे. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वनमहोत्सवात ही रोपे ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शासनाचे विविध विभाग, सामाजिक व निसर्गप्रेमी संस्था आणि शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने उपलब्ध होणार आहेत.

ठळक मुद्देवन महोत्सव देशी वृक्षाच्या लागवडीतून हिरवाईबरोबर साधली जाणार जैवविविधतादुष्काळात मिळाला रोजगारतब्बल दिड लाख कडुनिंबाची रोपे

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : यावर्षी दुष्काळी स्थिती असतानाही वनविभागाने शिवणी नजीकच्या जंगलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत तब्बल अडीच लाखांवर विविध वृक्षांच्या रोपांची जतन केली आहे. १ जुलैपासून सुरू होणाऱ्या वनमहोत्सवात ही रोपे ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शासनाचे विविध विभाग, सामाजिक व निसर्गप्रेमी संस्था आणि शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने उपलब्ध होणार आहेत.उजाड सीताड बहरलीवनवासात असताना सीतामाईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली म्हणून सीताड नावाने ही डोंगर रांग ओळखली जाते. यातीलच ३५८/२ या हद्दीत वनविभागाने प्रयत्नपूर्वक रोपवाटिका तयार केली आहे. जिल्हा उपवनसंरक्षक डी.डब्ल्यू. पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा विभागाचे वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई, वनपाल आर.व्ही.चौरे यांनी खास याकामी लक्ष पुरवत उजाड, बोडक्या जागेला निसर्ग वैभव प्राप्त करून दिले आहे.हिरवा शालू पण देशी ठेवणीचाहिरवाईबरोबरच जैवविविधता टिकविण्यासाठी व देशी वनसंपत्तीचा ठेवा जतन करण्याच्या हेतूने या रोपवाटिकेत जाणीवपूर्वक कडुनिंब, कैठ, सीताफळ, बाभुळ, बोर, आवळा, चिंच, गुलमोहर, बेल, खैर, करंज, बांबू, शिरस, काशीद, पापडी आदी देशी वृक्ष, वंशातील रोपनिर्मितीवर भर देण्यात आला आहे.रोपवाटिकेत विविध वृक्षांची एकूण अडीच लाख रोपे निर्माण करण्यात आली आहेत. तब्बल दीड लाख कडुनिंबाची रोपे लावणीसाठी तयार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक मजुरांकरवी निंबोळी जमा करून रोपे तयार केली आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कडुनिंबाची रोप निर्मिती करणारी जिल्ह्यातील ही प्रथम रोपवाटिका ठरावी. यातील रोपे लागवडीसाठी योग्य अशी १८ महिन्यांची झाली आहेत. दुसरी ९ महिन्याची रोपेदेखील आहेत. उन्हापासून रोपाचे संरक्षण होण्याकामी व सावलीसाठी एरंड लावण्यात आले आहेत. पाण्यासाठी खास टाकी व स्वतंत्र २५-३० नळी बसविण्यात येऊन रोपांना पाणी दिले जाते.रोपवाटिकेत पिशव्यात माती भरणे, बी रुजवणे, निंदणी, खते देणे, लहानमधून मोठ्या थैल्यात रोप हलवणे (शिफ्टींग) यासाठी ऐन दुष्काळात ५०-६० महिलांना काम मिळाले. याशिवाय कायमस्वरुपी ३० महिलांना रोजगार मिळणार आहे. वनसेवक छोटू अभिमन पाटील, आबा उत्तम पाटील, देवरे, राठोड आदी रात्रंदिवस देखभाल करण्यासाठी आहेत.अन् डोंगरात लागले दिवेरोपवाटिकेत रात्री अंधार पडून रानडुकरे, हरणे, रोपांचे नुकसान करू नये म्हणून सूर्यप्रकाशावर चालणारे तीन पॅनल उभारुन एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. त्यांच्या प्रकाशझोतात रोपवाटिका रात्री उजळून निघते.एकूणच आयुर्वेदिक महत्व, पाऊस पाडण्यासाठी ढगांना गारवा देणारी, वटवाघुळ, चिमणी, रातकीडे अशी जैवविविधतेची बिजारोपण करणारी पशु-पक्ष्यांची सजीव साखळी व व्यवस्था जिवंत ठेवत पर्यावरणाचा समतोल राखणारी देशी वृक्षांची रोपे लागवड व संगोपनाची जनतेची चळवळ या वनमहोत्सवाच्या निमित्ताने उभी राहील, अशी अपेक्षा आहे.वैशिष्ट्यपूर्ण रोपवाटिकापाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्वात मोठी व देशी वृक्षाची, अठरा महिन्यांची सुदृढ रोपे असलेली जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशी ही रोपवाटिका आहे. शासकीय विभाग, ग्रां.प., निसर्ग संस्था, शेतकरी यांना एक जुलैपासूनच्या वनमहोत्सव काळात सवलतीच्या दरात ही रोपे मिळणार आहेत.-ज्ञानेश्वर देसाई,-वनक्षेत्रपाल, पाचोरा वनविभाग 

टॅग्स :environmentवातावरणBhadgaon भडगाव