रावेर तालुक्यातील रतनपाडा गावात पकडला अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 16:41 IST2019-10-06T16:40:38+5:302019-10-06T16:41:44+5:30
पाल येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पर्वत रांगेतील रतनपाडा गावात रविवारी अजगर पकडण्यात आले.

रावेर तालुक्यातील रतनपाडा गावात पकडला अजगर
पाल, ता.रावेर, जि.जळगाव : पाल येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पर्वत रांगेतील रतनपाडा गावात रविवारी अजगर पकडण्यात आले.
दुपारी दोनला गावात अजगर फिरत असल्याची माहिती वन्यजीव वनविभागाला मिळाली होती. त्यावर वनविभागाच्या यंत्रणेने अजगराला पकडले.
या वेळी पाल वन्यजीव वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजेश पवार, वनरक्षक अय्यूब तडवी, सकीना तडवी, सविता बारेला, राजमल बारेला, शातांराम बनगे, अमोल चव्हाण, युसूफ खान, परमान तडवी, अकबर तडवी यांनी अजगर सुरक्षितपणे पकडले आणि लगेच घनदाट वनात पुन्हा त्याला सोडण्यात आले.
याआधी ग्रामस्थांमध्ये काहीही भीतीही निर्माण झाली होती. मात्र वनविभागाच्या यंत्रणेने त्यांना धीर दिला.