डॉ. योगेश राणे यांचा पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:35+5:302021-07-03T04:11:35+5:30
मुक्ताईनगर : तालुक्यातील उचंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात कोरोना काळात ...

डॉ. योगेश राणे यांचा पुरस्काराने गौरव
मुक्ताईनगर : तालुक्यातील उचंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यात कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश राणे यांना आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्काराने गौरवण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम महाराज युवा फाउंडेशन यांनी केले. जिल्हा बँकेचे माजी व्यवस्थापक एन.जी. शेजोळे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सदस्य किशोर चौधरी, सरपंच शशिकला शेषराव पाटील, जिल्हा उपरुग्णालयाचे अधीक्षक योगेश प्रभाकर राणे, पोलीस पाटील जितेंद्र लक्ष्मण पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश पाटील, डॉ. गडेकर, डॉ. तुषार पाटील, जितेंद्र पाटील, संभाजी ब्रिगेडचे किशोर पाटील, प्रवीण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छबिलदास पाटील यांनी, तर आभार किशोर पाटील यांनी मानले.
डॉ.राणे यांच्या रूपाने देव पावला -एन.जी. शेजोळे
डॉ.योगेश राणे यांच्या रूपात आम्ही खऱ्या अर्थाने देव रूपाने पाहिला. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असताना कुठल्याही गोष्टीला न भिता रुग्णांना योग्य ते सल्ला देणे व त्यावर योग्य तो उपचार करून रुग्णांना बरे होईपर्यंत त्यांची विचारपूस करणारा व्यक्तिमत्त्व म्हणजेच खऱ्या अर्थाने डॉ. राणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, अशा व्यक्तीची मुक्ताईनगर तालुक्याला नव्हे तर महाराष्ट्राला गरज आहे, असे मनोगत एन.जी. शेजाेळे यांनी व्यक्त केले.