डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 11:35 IST2019-03-24T11:35:54+5:302019-03-24T11:35:59+5:30

...तर रावेरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार नाही

Dr. Ulhas Patil's agitation for the candidature | डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारीसाठी आंदोलन

डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारीसाठी आंदोलन


जळगाव : जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेसला सुटणार नसल्याचे समजताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रावेरची जागा कॉग्रेसलाच मिळावी आणि या ठिकाणी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी मिळावी या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन केले.
या आंदोलनात युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष परवेज पठाण, अल्पसंख्यांक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जाकीर बिसमिल्ला बागवान, दीपक बाविस्कर, युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शाकीर खान, जाकीर खान, महिला महानगर अध्यक्षा अरुणा पाटील, शाम कुलकर्णी, योगेश माळी, दीपक पाटील, मधू धोबी, अविनाश शेळके, कल्पना सैंदाणे, संजीवनी खामकर, सरुबाई साळवे, वंदना नन्नवर सहभागी झाले होते.
...तर रावेरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार नाही
रावेरची जागा काँग्रेसला मिळाली नाहीतर काँग्रेस कार्यकर्ते रावेर मतदार संघात राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका परवेज पठाण यांनी आंदोलन प्रसंगी मांडली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या.
रावेरबाबत आज निर्णय - जयंत पाटील
रावेर लोकसभा मतदार संघाविषयी अद्याप चर्चा सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. याप्रश्नी रविवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.

Web Title: Dr. Ulhas Patil's agitation for the candidature