डॉ. मोनिया केदारच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST2021-09-14T04:19:21+5:302021-09-14T04:19:21+5:30

डॉ. मोनिया हिने पहिल्यांदाच मिस इंडिया या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून संपूर्ण भारतातून टॉप पंधरामध्ये ...

Dr. Miss India crown on the head of Monia Kedar | डॉ. मोनिया केदारच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

डॉ. मोनिया केदारच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

डॉ. मोनिया हिने पहिल्यांदाच मिस इंडिया या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून संपूर्ण भारतातून टॉप पंधरामध्ये येण्याचा मानही तिने मिळवला आहे. मिस इंडिया कार्यक्रमात भाग घेऊन उत्तुंग भरारी घेणारी डॉ. मोनिया केदार ही चोपडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक मुकुंद केदार व शिक्षिका उषा बाविस्कर (केदार) यांची मुलगी आहे. पुढील महिन्यात दुबई आणि न्यूयॉर्क येथे होणाऱ्या फॅशन वीक कार्यक्रमासाठी डॉ. मोनियाची वर्णी लागली आहे.

कार्यक्रमाचे प्रशिक्षक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आदिती गोवित्रीकर, मिस युनिवर्स २००१ मिस सेलिना जेटली, प्रसिद्ध हॉकीपटू युवराज वाल्मिकी उपस्थित होते. सूत्रसंचालन मॉडेल सिद्धांत सूर्यवंशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आर्यनमॅन डॉ. स्वरूप पुराणिक आणि मिस इंटरनॅशनल वर्ल्डच्या मानकरी सुपर मॉडेल डॉ. अक्षता प्रभू यांनी विशेष परिश्रम घेतले.

130921\13jal_4_13092021_12.jpg

डॉ. मोनिया केदार

Web Title: Dr. Miss India crown on the head of Monia Kedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.