डॉ. नीलेश किनगे यांनी परत केली जादा बिलाची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:52+5:302021-07-01T04:13:52+5:30

जळगाव : डॉ. नीलेश किनगे यांनी तक्रारदार दीपक कावळे यांची दोन लाख ४४ हजार रुपयांची रक्कम परत केली आहे. ...

Dr. Excess bill refunded by Nilesh Kinge | डॉ. नीलेश किनगे यांनी परत केली जादा बिलाची रक्कम

डॉ. नीलेश किनगे यांनी परत केली जादा बिलाची रक्कम

जळगाव : डॉ. नीलेश किनगे यांनी तक्रारदार दीपक कावळे यांची दोन लाख ४४ हजार रुपयांची रक्कम परत केली आहे. दीपक कावळे यांच्या आई उषा कावळे यांना डॉ. नीलेश किनगे यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे बिल ४ लाख ६० हजार रुपये देण्यात आले होते. हे बिल कावळे यांच्याकडून वसूल करण्यात आले. मात्र दीपक कावळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. सहा महिने सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर डॉ. नीलेश किनगे यांनी दोन लाख ४४ हजार रुपये नियोजन भवनात लेखाधिकारी कैलास सोनार यांच्यासमोर परत केले आहेत. त्याचा धनादेश देखील डॉ. किनगे यांनी उषा कावळे यांच्या नावे दिला आहे.

दीपक कावळे यांनी याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची तक्रार निवारण समितीसमोरदेखील सुनावणी घेण्यात आली.

Web Title: Dr. Excess bill refunded by Nilesh Kinge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.