डॉ. अब्दुल करीम सालार यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:19 IST2021-02-25T04:19:40+5:302021-02-25T04:19:40+5:30

समता संस्थेतर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन जळगाव : समता जागृती बहुउद्देशिय संस्थेतर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष यशवंत ...

Dr. Abdul Karim Salar felicitated | डॉ. अब्दुल करीम सालार यांचा सत्कार

डॉ. अब्दुल करीम सालार यांचा सत्कार

समता संस्थेतर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन

जळगाव : समता जागृती बहुउद्देशिय संस्थेतर्फे राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष यशवंत घोडेस्वार, सामाजिक कार्यकर्ते आनंदा तायडे, गौतम सपकाळे, राजू सपकाळे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नाना डोंगरे, विकास तायडे, आकाश आढंगे, राजू शिरसाठ, विनोद सोनवणे, शंकर गरूड

आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लियाकत तडवी यांची निवड

जळगाव : जिल्हा आदिवासी विकास परिषदेच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी लियाकत यासिन तडवी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्याहस्ते तडवी यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे नीरज चव्हाण, पकंज तडवी, उल्हास ठाकरे यांनी अभिनंदन केले.

गांधी विद्यालयात चिंतन दिन साजरा

जळगाव : तालुक्यातील भादली येथील महात्मा गांधी विद्यालयात स्काऊट गाईड चळ‌वळीचे जनक `लॉर्ड बेडन पॉवेल ` यांचा जन्मदिन हा चिंतन दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक आर. के. तायडे, पी. एस. पाटील, पी. जी. बागुल, आर. पी. अत्तरदे, पी. जे. नारखेडे आदी शिक्षक उपस्थित होते.

राष्ट्रसंत गाडगेबाबांना अभिवादन

जळगाव : हेलमा माता महिला बहुउद्देशिय संस्थेतर्फे संत गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला संस्थेच्या अध्यक्षा छाया कोरडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्षा ज्योती कोरडे, सचिव आश्निनी लोहार, दुर्गा तेलुंगू, विद्या बाविस्कर, शोभा अहिरे, आकांक्षा कोरडे आदी महिला उपस्थित होत्या.

Web Title: Dr. Abdul Karim Salar felicitated