‘अमृत’अंतर्गत राहिलेल्या वाढीव भागातील १६५ कॉलन्यांच्या कामांचा डीपीआर तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:20 AM2020-12-30T04:20:19+5:302020-12-30T04:20:19+5:30

अमृतचे काम लांबणार ? : १८० किमीचे काम वाढणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘अमृत’अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या ...

DPR prepared for the works of 165 colonies in the extended areas under 'Amrut' | ‘अमृत’अंतर्गत राहिलेल्या वाढीव भागातील १६५ कॉलन्यांच्या कामांचा डीपीआर तयार

‘अमृत’अंतर्गत राहिलेल्या वाढीव भागातील १६५ कॉलन्यांच्या कामांचा डीपीआर तयार

Next

अमृतचे काम लांबणार ? : १८० किमीचे काम वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ‘अमृत’अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेत मनपा प्रशासनाने केलेल्या चुकांचा प्रताप योजना अंतिम टप्प्यात असताना समोर आला आहे. शहराती वाढीव भाग असलेल्या १६५ कॉलन्यांचा समावेश मनपाने अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात केला नव्हता. या भागांचाही समावेश करण्याचा सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर महिनाभरानंतर मनपाने १६५ कॉलन्यांच्या कामासाठी ४२ कोटींचा डीपीआर तयार केला आहे. त्यामुळे अमृतचे काम पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

मनपा प्रशासन व मजिप्राने पूर्णपणे या योजनेची वाट लावली असल्याचे आता सर्वच पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अमृत योजना अंतिम टप्प्यात असून, मार्च २०२१पर्यंत या योजनेचे काम पूर्ण करावयाचे आहे. चार महिन्यांत मक्तेदाराला पाणीपुरवठा योजनेचे ३५ टक्के कामासह वाढीव भागाचेही काम पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान, वाढीव कामाची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी राहणार असून, यासाठी शासनाकडून पूर्ण योजनेला अजून मुदतवाढ मिळू शकते, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.

प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा

महापालिकेने अमृतअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी १६५ कॉलन्यांचा नव्याने डीपीआर तयार केला असला तरी अंतिम मंजुरीसाठी या प्रस्तावाला मोठी प्रदक्षिणा घालावी लागणार आहे. डीपीआर तयार करण्यात आल्याने हा डीपीआर महासभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मंजुरी तांत्रिक मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाची परवानगी मिळाल्यानंतरही निविदाप्रक्रिया राबवायची की सध्या सुरू असलेल्या मक्तेदाराकडून हे काम करवून घ्यायचे याबाबतीतदेखील निर्णय मनपा प्रशासनाला घ्यावा लागणार आहे.

या भागांचा समावेश

शहरातील अनेक वाढीव भागातील कॉलन्यांचा समावेश अमृत योजनेच्या डीपीआरमध्ये करण्यात आला नव्हता. यामध्ये वाघनगर परिसर, रामानंदनगरातील वाढीव भाग, खोटेनगर परिसरातील विस्तारित भाग, चंदू अण्णानगरातील विस्तारित भाग, पवार पार्क, निमखेडी शिवारातील विस्तारित भाग, अयोध्यानगर विस्तारित भाग, केसी पार्कच्या पुढील महादेवनगर, खेडी परिसर, राजारामनगर, सत्यम पार्क परिसरातील वाढीव भाग, ममुराबादकडील वाढीव भागाचा समावेश आहे. दरम्यान, या भागातील कामांना एप्रिल-मे महिन्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Web Title: DPR prepared for the works of 165 colonies in the extended areas under 'Amrut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.