जिल्हा क्रीडा संकुलाचे शुल्क दुप्पट केल्याने गाेंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST2021-01-08T04:46:38+5:302021-01-08T04:46:38+5:30
जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर सरावासाठी मासिक पासेसचे अर्ज भरण्याकरिता सोमवारी सकाळी विद्यार्थांनी एकच गर्दी केली होती. मात्र, ...

जिल्हा क्रीडा संकुलाचे शुल्क दुप्पट केल्याने गाेंधळ
जळगाव : जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानावर सरावासाठी मासिक पासेसचे अर्ज भरण्याकरिता सोमवारी सकाळी विद्यार्थांनी एकच गर्दी केली होती. मात्र, पासेस मिळण्यासाठी विलंब लागत असल्यामुळे क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळच गोंधळ झाल्याचा प्रकार दुपारी बाराच्या सुमारास घडला.
कोरोनामुळे जिल्हा क्रीडा संकुलही विद्यार्थांसाठी बंद होते. शासनाने नुकतीच परवानगी दिल्यामुळे विद्यार्थांची प्रवेश प्रक्रियेसाठी गर्दी होत आहे. दरम्यान, यंदा जिल्हा क्रीडा संकुल प्रशासनाने येथील मैदानावर सरावासाठी मासिक पासची किंमत १०० रूपयांवरून २०० रूपये केली आहे. सुरुवातीला या दरवाढीला विरोधही झाला होता. परंतु, करण्यात आलेल्या दरवाढीनुसार विद्यार्थांकडून पासेसचे शुल्क आकारण्यात येत आहे. सोमवारी सकाळी पासेस मिळण्यासाठी विद्यार्थांनी सकाळपासूनचं गर्दी केली होती. रांगेतील विद्यार्थांना नंबर प्रमाणे पासेसची देण्याची प्रक्रिया सुरू असतानांही, काही विद्यार्थांनी पासेसला विलंब होत असल्यामुळे गोंधळ घातला.
इन्फो :
विद्यार्थांना क्रीडा संकुलातील मैदानावर सरावाचे मासिक पास देण्याची प्रक्रिया २५ डिसेंबर पासून सुरू केली आहे. ५ जानेवारी ही शेवटची मुदत आहे. मुदत संपत असल्यामुळे विद्यार्थांची गर्दी वाढली आहे. विद्यार्थांनी गोंधळ न घालता, सोशल डिस्टनिंगचे पालन करुन पासेस घेणे गरजेचे आहे.
मिलिंद दिक्षीत, जिल्हा क्रीडा अधिकारी.