देशी दारूची वाहतूक करणा:या तिघांना पकडले

By Admin | Updated: April 5, 2017 00:31 IST2017-04-05T00:31:30+5:302017-04-05T00:31:30+5:30

चोपडा : दोघांना अटक, एकाला जामीन

Domestic liquor traffic: caught the three | देशी दारूची वाहतूक करणा:या तिघांना पकडले

देशी दारूची वाहतूक करणा:या तिघांना पकडले

चोपडा : शहरातून  देशी दारू नेणा:या तिघांना पकडण्यात आले. यापैकी दोघांना अटक करण्यात आली, तर एकाची जामीनावर मुक्तता करण्यात आलेली आहे.
 पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार   4 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या मागच्या बाजूस दुचाकीवरून  (एम.एच.19 सी.एच.2239) चार हजार रुपये किमतीची वाहतूक करताना समाधान भगवान कोळी व अभिजित प्रल्हाद कोळी (रा.लासुर ता.चोपडा) या दोघांना पकडले. या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार  कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय निकम व सहायक फौजदार दत्तात्रय पाटील कॉन्स्टेबल प्रवीण मांडोळे यांनी केली.
तसेच दुस:या घटनेत  पेट्रोल पंपाजवळ संदीप राजेंद्र  सपकाळे (रा आडगाव) यास 750 रुपये किमतीची देशी दारू जवळ बाळगताना पकडण्यात आले. सपकाळे याची जामीनावर मुक्तता करण्यात आली.  या दोन्ही घटनांबाबत शहर पोलीस ठाण्यात कॉ.प्रवीण मांडोळे यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        (वार्ताहर)

Web Title: Domestic liquor traffic: caught the three