शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

एकनाथराव खडसेंना कामांचे श्रेय मिळू नये यासाठी कामे रखडली : डॉ.राधेश्याम चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 16:02 IST

समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल

ठळक मुद्देसमांतर रस्त्यांसाठी दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनडीपीआरची स्थिती सांगावी अन्यथा माफी मागावीआमदार सुरेश भोळे यांना ६० टक्के जनमत नाहीच

जळगाव : समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल, अशी माहिती कॉँग्रेसचे महानगर कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रश्नी जळगाव फर्स्टच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, समांतर रस्त्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर हँडलवर दररोज सकाळी आठवण करून दिली. आज ६०० वे ट्विट करण्यात आले आहे.समांतर रस्त्याअभावी अनेकांचे बळी जात आहेत, तरीही याप्रश्नी सत्ताधारी भाजपा असंवेदनशील का आहे? जळगावकरांनी समांतर रस्त्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर डीपीआरचे कवित्व सुरू झाले. सुरुवातीला ३६५, त्यानंतर १००, १२५ आणि आता १३९ कोटी रुपयांचा डीपीआर तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण तो अजूनही मंजूर नाही.तर महामार्गाचा दर्जा गमावू शकतोजळगाव शहराच्या बाहेरून बायपास झाल्यावर सध्याचा रस्ता आपला महामार्गाचा दर्जा गमावू शकतो. अशावेळी केंद्र सरकार देखील आपली जबाबदारी झटकेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रकार म्हणजे भाजपाचे षङ्यंत्र तर नाही असा प्रश्नही डॉ. चौधरी यांनी केला. जळगाव-औरंगाबाद, जळगाव-पाचोरा रस्त्याची कामे युध्दपातळीवर होत असताना चिखली ते फागणे या पट्ट्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी ठेकेदार का मिळू नये? असा प्रश्न डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थित केला. तसेच समांतर रस्त्याबाबत दिवाळीनंतर आंदोलन केले जाईल, असा इशाराही दिला.आमदार पटेल भाजपाचे ‘एटीएम’१८ हजार ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते जळगावात झाले. तेव्हापासूनच लोकप्रतिनिधींमध्ये पत्रकबाजीची स्पर्धा सुरू झाली आहे. पालकमंत्र्यांनी आठ दिवसात काम सुरू होईल, असे सांगितले होते.तर गिरीश महाजन दुसरेच काही सांगतात. आमदार भोळे तिसरेच काही तरी सांगतात. निवडणुका आल्या की आमदार चंदुलाल पटेल हे पुढे येतात. आमदार पटेल म्हणजे भाजपाचे ‘एटीएम’ असल्याचाही आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी घेतला.आमदार सुरेश भोळे यांना ६० टक्के जनमत नाहीचआमदार सुरेश भोळे हे ६० टक्के जनमत असल्याचे सांगतात. मनपात निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांचे जनमत घ्या पाचही त्यांच्या बाजूने नसतील असा टोलाही डॉ. चौधरी यांनी मारला.डीपीआरची स्थिती सांगावी अन्यथा माफी मागावीशहरातील समांतर रस्ते तसेच १८०० कोटींच्या कामांचे श्रेय एकनाथराव खडसे यांना मिळू नये म्हणूनही कामे रखडले असल्याचा आरोप डॉ.राधेश्याम चौधरी यांनी केला. खडसे म्हणजे जे बोलतो ते करतो अशी त्यांची ख्याती आहे. मात्र त्यांनी कबुल केले ते होऊ नये असा प्रयत्न या पक्षातील काही मंडळींचा आहे मात्र याचा भुर्दंड पाच लाख जळगावकरांना बसत आहे. स्थानिक आमदार व खासदारांनी या रस्त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर) आजची स्थिती सांगावी किंवा जळगावकरांची माफी मागावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेJalgaonजळगावcongressकाँग्रेस