मोहाडी रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:26+5:302021-07-02T04:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : डॉक्टर्स डे निमित्त केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या रासेयो विभागातर्फे मोहाडी शासकीय ...

मोहाडी रुग्णालयातील डॉक्टरांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : डॉक्टर्स डे निमित्त केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या रासेयो विभागातर्फे मोहाडी शासकीय रुग्णालय येथील डॉ. प्रवीण पाटील, डॉ. योगिता फेगडे, डॉ. स्नेहा पाटील, डॉ. कुमावत यांच्यासह तेथील परिचारिका व स्टाफ यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. प्रवीण कोल्हे यांची उपस्थिती हाेती. डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. सध्या कोरोनाचे महासंकट पाहता प्रत्येकाच्या मनात याबद्दल भीती निर्माण झाली आहे, तर कोरोनाच्या काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, तरीही कोरोनाच्या विरोधातील लढाई अद्याप सुरूच आहे. त्याचसोबत देशभरातील डॉक्टर्स, नर्स आणि अत्यावश्यक सेवा सुविधांमधील कर्मचारी अहोरात्र रुग्णांची सेवा करताना दिसून येत असल्याचे मनोगत प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी, विभागप्रमुख प्रा. नीलेश जोशी, जनसंपर्क अधिकारी प्रा. संदीपकुमार केदार, मोहन चौधरी, नीलेश नाईक, विजय चव्हाण, केतन पाटील, गणपत बेंडकोळी व परविंदर रीसम, आदींची उपस्थिती होती.