ब्राह्मण महिला मंडळातर्फे ग्रामीण रुग्णालयात ‘डॉक्टर्स डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST2021-07-04T04:11:44+5:302021-07-04T04:11:44+5:30

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, डॉ. पंकज नानकर, डॉ. इम्रान शेख, डॉ. अनुपमा भावसार, डॉ. सुनील गवळी, ...

Doctor's Day at a rural hospital organized by Brahmin Mahila Mandal | ब्राह्मण महिला मंडळातर्फे ग्रामीण रुग्णालयात ‘डॉक्टर्स डे’

ब्राह्मण महिला मंडळातर्फे ग्रामीण रुग्णालयात ‘डॉक्टर्स डे’

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, डॉ. पंकज नानकर, डॉ. इम्रान शेख, डॉ. अनुपमा भावसार, डॉ. सुनील गवळी, नर्स स्टाफ, वाॅर्ड बॉय, चालक, औषधनिर्माता, यासह सर्वच कर्मचाऱ्यांना महिला मंडळातर्फे सन्मानित करण्यात आले, तसेच ग्रामीण रुग्णालयाला स्टेशनरी भेट देण्यात आली.

ब्राह्मण महिला मंडळाने केलेल्या गौरवाने रुग्णालय कर्मचारी भारावून गेले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून श्री परशुराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंडळाच्या कार्यकारिणी अध्यक्षा सुनीता तिवारी, सोनाली गौड यांनी वैद्यकीय सेवेबद्दल मनोगत व्यक्त केले. अध्यक्षा सुनीता तिवारी, उपाध्यक्षा तृप्ती नाईक, सोनाली गौड, सचिव गौरी भट, सहसचिव मधुरा पाठक, कोषाध्यक्ष पूजा तांबोळी, मयुरी बिल्दीकर, शर्वरी तांबोळी, क्षमा शर्मा, राधा शर्मा, दीपा जोशी, आरती दायमा या महिला मंडळातील सदस्यांनी कोरोनाचे निर्बंध पाळून ‘डॉक्टर्स डे’ उत्साहात साजरा केला. सूत्रसंचालन मयुरी बिल्दीकर यांनी केले.

Web Title: Doctor's Day at a rural hospital organized by Brahmin Mahila Mandal