अज्ञात वाहनाच्या धडकेने शिरसोली येथील डॉक्टर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:39 IST2017-09-18T12:31:14+5:302017-09-18T12:39:14+5:30

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिरसोली प्र.बो.येथील माजी सरपंच डॉ.उत्तमराव शिवराम पाटील (वय ६५, मुळ रा.वडजी, ता.भडगाव) ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली.

A doctor from Shirsoli was killed by an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने शिरसोली येथील डॉक्टर ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने शिरसोली येथील डॉक्टर ठार

ठळक मुद्दे रामदेववाडीजवळ झाला अपघात रात्रभर मृतदेह जागेवरच होता पडून अज्ञात वाहनाने धडक दिली

आॅनलाईन लोकमत

जळगाव, दि.१८ : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिरसोली प्र.बो.येथील माजी सरपंच डॉ.उत्तमराव शिवराम पाटील (वय ६५, मुळ रा.वडजी, ता.भडगाव) ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रामदेववाडी येथील टेकडीवर हा अपघात झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ.उत्तमराव पाटील हे वडजी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन होते.कार्यकाळ संपल्याने ते रविवारी वडजी येथे पदाचा राजीनामा देण्यासाठी गेले होते. दुपारी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्यानंतर सायंंकाळी दुचाकीने शिरसोली येथे येण्यासाठी निघाले. रस्त्यात वडली व वावडदा येथे सहकाºयांकडे थांबले होते. वावडदा येथून आठ वाजता निघाल्यानंतर रामदेववाडी टेकड्याजवळ त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.

Web Title: A doctor from Shirsoli was killed by an unknown vehicle